Pune Crime news : गुंतवणूक करताय? सावधान...! पुण्यातील नवरा-बायकोनं मिळून अनेकांना घातला 16 कोटींचा गंडा
पुण्यातील दाम्पत्याने शेकडो लोकांना तब्बल 16 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली केली शेकडो लोकांची फसवणूक केली आहे.
Pune Crime news : गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना (Pune Crime news ) गंडा घातल्याच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. गुंतवणुकीचं आणि जास्त नफा देण्याचं आमिष दाखवून पुणेकरांना गंडा घातला जात असल्याचं अनेक घटनांमधून समोर येत आहे. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. पुण्यातील दाम्पत्याने शेकडो लोकांना तब्बल 16 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. अविनाश राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली केली शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी APS वेल्थ वेंचरचे संचालक अविनाश राठोड आणि त्यांची पत्नी विशाखा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे गुंतवा यावर चांगले पैसे परत मिळतील असे आमिष दाखवून शेकडो लोकांना घातला गंडा घातला आहे. हा सगळा प्रकार 2018 पासून सुरू होता. या प्रकरणात अविनाश राठोड आणि त्यांच्या पत्नी विशाखा राठोड यांनी ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेगवेगळ्या स्कीम मध्ये 1 कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र फिर्यादी यांनी जेव्हा परताव्याची मागणी केली तेव्हा त्यांना एक ही रुपया परत मिळाला नाही. अशा प्रकारे या दोघांनी मिळून शेकडो लोकांना तब्बल 16 कोटी रुपयांचा गंडा घातला. मात्र हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता दोघांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूक करताय? सावधान.....
पुण्यात अशा प्रकारचे आमिष दाखवून लुटणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं मागील काही घटनांमधून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे सायबर पोलिसांनी क्रिप्टोबिझ कंपनीचा संचालक राहुल विजय राठोड (वय 35, रा. हिंजवडी) याच्यासह त्याचा साथीदार ओंकार दीपक सोनवणे (25, रा. कोंढवा) याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या दोघांवर 43 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांनी सुमारे 2 कोटी 930 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले होते. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन दुचाकी, एक मोटारसायकल, एक लॅपटॉप, एक मोबाईल संच, एक पेन ड्राईव्ह जप्त केला होता. आरोपींनी तक्रारदारांपैकी एक असलेल्या रविशंकर पाटील यांना त्यांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते आणि त्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती.