एक्स्प्लोर
पुण्यात जळीतकांडानंतर 'फाडीतकांड', 35 ते 40 दुचाकींचे सीट कव्हर फाडले
पुणे : पुण्याच्या हडपसर परिसरात 35 ते 40 दुचाकींच्या सीट कव्हर्स फाडल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. निर्मलनगर परिसरातील एका टाऊनशीपमध्ये काल (मंगळवारी) रात्री ही घटना घडली.याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील हडपसर, कात्रज, कोथरुड या परिसरात याआधी दुचाकी गाड्या जाळण्याचे प्रकार घडले होते. तब्बल तीन-चार वेळा या घटना घडल्याने पुणेकरांमध्ये दहशत होती.
मात्र यावेळी सीट कव्हर्स फाडण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनांमागे कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे, हे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement