Pune: कोथरूडच्या सावरकर पुलावरून जाताना नियंत्रण सुटलं अन् कठड्यावर गाडी आदळली, दोघांचा मृत्यू
Pune Accident: वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Accident : पुण्यात वाढत्या अपघातांची मालिका सुरुच असून वेगावर नियंत्रण नसल्याने तसेच वाहतूकीचे नियम न पाळल्याने होणारे अपघातही अधिक असताना कोथरूडच्या सावरकर पुलाच्या कठड्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दोन तरुणांची दुचाकी आदळली. दोन्ही तरुणांचा पूलाच्या कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. कोथरूडमधील पौड फाट्याजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. पुलाच्या कठड्यास धडकून दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पहाटे तीनच्या सुमारास घडला. या दुर्घटनेत सर्वेश गोपाळ पाटील (वय 20) आणि पुष्कर सुधाकर चौधरी (वय 19, रा. तुरक गुप्हाडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) या तरुणांचा मृत्यू झाला. (Kothrud Accident)
वेगावरचे नियंत्रण सूटले, दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळली
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश पाटील हा त्याचा मित्र पुष्कर चौधरी याच्यासोबत दुचाकीवरून स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावरून जात होता. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ती थेट पुलाच्या कठड्यावर धडकली. जोरदार धडकेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले.अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.
आई वडील बाहेर जाताच मुलाला 50 हजारात विकण्यासाठी घेऊन गेला अन्...
पुण्यातील पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षांच्या मुलाला 50 हजारात विकण्यासाठी मुलाच्या परिचित व्यक्तींना त्याचा अपहरण केल्याची घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुलाचे आई-वडील कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्याला चिंचवड वरून थेट चाळीसगावला अपहरण करून येणाऱ्या आरोपीला चिंचवड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने पकडला आहे. पोलिसांनी आठ वर्षाच्या मुलाला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले आहे.
हेही वाचा:
























