एक्स्प्लोर
'संजय राऊतांनी माफी मागावी', उद्धव ठाकरेंसमोर मराठा आंदोलकांची निदर्शनं
पाचोरा (जळगाव): जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. संजय राऊतांनी माफी मागावी असे फलक दाखवून मराठा आंदोलकांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमस्थळी निदर्शनं केली.
आंदोलकांनी हाती फलक घेऊन, डोक्याला आणि हाताला काळं कापड बांधून आपला निषेध व्यक्त केला. या निदर्शनानंतर उद्धव ठाकरेंनी आंदोलकांशी चर्चाही केली.
दरम्यान, ‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली होती. “व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास, शिवसेनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींची माफी मागतो.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली होती.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंनी काढलेल्या व्यंगचित्रावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. मराठा मोर्चांबद्दल वादग्रस्त ठरलेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, तरीही वाद कमी होण्याचा नाव घेत नव्हता. अखेर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली होती.
तरीही संजय राऊत यांनी माफी मागावी अशी आता आंदोलकांची मागणी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement