एक्स्प्लोर
प्रिती बारिया हत्या प्रकरण : दोन्ही दोषींना फाशी
एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश घुसून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन मुलांना कायमचं अपंगत्व आलं.
भंडारा : भंडाऱ्यातील बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी हा निकाल दिला.
काय आहे प्रकरण?
एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश घुसून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन मुलांना कायमचं अपंगत्व आलं. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 30 जुलै 2015 रोजी ही घटना घडली होती. दुपारी दोनच्या सुमारास म्हाडा कॉलनीमधील रवींद्र शिंदे यांच्या घरी, त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचं पाहून, आमीर आणि सचिन एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसले. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने हल्ला करुन घरातील दागिने, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरलं. या घटनेत अश्विनीला कायमचं अपंगत्व आलं होतं.
यानंतर आरोपींनी याच दिवशी रात्री आठच्या सुमारास तकिया वॉर्डातील रुपेश बारिया यांच्या घरीही एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला. आरोपींनी रुपेश यांच्या पत्नी प्रिती बारिया (वय 30 वर्ष) यांच्या डोक्यावर हातोडीने वार करुन हत्या केली. यावेळी त्यांचा मुलगा भव्य बारिया (वय 9 वर्ष) समोर आला असता, त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला. बारिया यांच्या घरातून सोनं-चांदीचे दागिने आणि 3 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली.
एटीएम कार्डमुळे आरोपींना बेड्या
आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी रवींद्र शिंदेंच्या घरातून चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन लोकेशन शोधून पोलिसांनी या दोघांना अटक करुन, पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याविरोधात कलम 302, 307, 397, 452 अंतर्गत गुन्हा नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. 26 साक्षीदार आणि जप्त केलेल्या हातोडीच्या आधारे दोघांना दोषी ठरवण्यात आलं. अखेर आज या खटल्यावर अंतिम सुनावणी करताना, जिल्हा न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement