एक्स्प्लोर

Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan on PM Modi : गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मी त्यांची देखील क्षमा मागतो जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतात, असे पीएम मोदी म्हणाले.

Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पालघर येथील सिडको मैदानावर 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याबद्दल मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त माझे आणि माझ्या मित्रांचे नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराज नाहीत. ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. पंतप्रधानांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही माफी मागितली आहे.

नुसती माफी मागून चालणार नाही

दरम्यान, मोदींच्या माफीनाम्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी (Prithviraj Chavan on PM Modi) तोफ डागली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली आहे. त्यांनी मध्येच सावरकरांना आणले. पंतप्रधान आणि भाजपला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे. माफी मागून काही फायदा होणार नाही, जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दरम्यान, पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी मुंबईत पुतळा पाडल्याचा निषेध केला. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. 

शिवरायांची शंभरवेळा माफी मागायला तयार

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुतळा पडल्याप्रकरणी माफी मागितली होती. सडकून टीकेला सामोरे जावे लागत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले की, गरज पडल्यास शंभरवेळा शिवरायांची माफी मागायची तयारी आहे. विरोधकांकडे राजकारण करण्यासाठी इतरही मुद्दे आहेत, पण महाराष्ट्रात आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना त्यापासून दूर ठेवले पाहिजे. दुसरीकडे, शिवरायाच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा जरांगे तिथून निघून गेलाEknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Osama Bin Laden Son Hamza : लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
लादेनचा मुलगा हमजा अजूनही जिवंत; करत असलेल्या तयारीने अमेरिकेपासून युरोपपर्यंत धडकी भरली!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 सप्टेंबर 2024 | शनिवार
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
होय, मी मध्यरात्री 2.30 वाजता अंतरवालीत गेलो, जरांगेंना भेटलो; रोहित पवाराचं भुजबळांना चॅलेंज
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
Embed widget