Ahmednagar: हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू राहणार; विद्यार्थी, पालकांच्या संमतीनं बैठकीत निर्णय
Ahmednagar: महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारनं 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अनेक निर्बंध लागू केले
Ahmednagar: महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारनं 9 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अनेक निर्बंध लागू केले. त्यातच राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये 16 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला अनेक शिक्षण तज्ज्ञांनी विरोध दर्शवलाय. यातच अहमदनगर येथील आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या बैठकीत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्यभरात अनेक शिक्षण तज्ज्ञांसह ग्रामस्थांकडून या निर्णयाला विरोध वाढू लागलाय. याचपार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत पालक-विद्यार्थी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत् हिवरेबाजार येथील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत पालकांनी आम्ही मुलांची काळजी घेत जबाबदारी घेऊ असं सांगत शाळा सुरू ठेवण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, शाळा बंद केल्या तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करू असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनीच दिला. कोरोना नियमांचे पालन करत आम्ही शाळा सुरू ठेवणार असल्याची माहिती यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिलीय.
महाराष्ट्रात बुधवारी 46 हजारांहून अधिक रुग्ण आढळले
राज्यात बुधवारी (12 जानेवारी) 46 हजार 723 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. तर, 32 जणांचा मृत्यू झालाय. याच दिवशी 28 हजार 41 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. . राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
महाराष्ट्रात बुधावारी 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात काल (12 जानेवारी) 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
हे देखील वाचा-
- Pandharpur Vitthal Rukmini Temple : विठुरायाच्या खजिन्यात सोन्या-चांदीच्या विटा येण्याचा मार्ग मोकळा
- Rajesh Tope : राज्यात आणखी 15 ते 20 दिवस शाळा बंद राहणार ; राजेश टोपे यांची माहिती
- सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha