एक्स्प्लोर

Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले

Crops Price Lower Than the MSP : शेतमालाला योग्य दर न मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला असून या सरकारला जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Crops Price Lower Than the MSP : राज्यात कापूस, सोयाबीन, हरभरा व तूर या पिकांना हमीभावापेक्ष कमी दर असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलं आहे. अगदी शेवटची अपेक्षा असलेल्या तुरीचे दर तर मागील तीन महिन्यात 4 हजाराने खाली कोसळल्याने शेतकरी चिंतेत आहे.  काही महिन्याआधी 11 हजार प्रतिक्विंटल असलेली तूर सध्या 6 हजार 200 ते 7000 हजाराच्या दरात व्यपाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. त्यामुळे आमचा शेतमाल बाजारात आला की दर खाली येतात हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आयातीला मंजुरी दिल्याने शेतमालाचे भाव कोसळले

कापसाचा हमीभाव 7520 असतांना कापसाला 7 हजार भाव मिळत आहे. सोयाबीन 4892 हमीभाव असताना सोयाबीनला 4 हजार रुपये प्रति क्विंटल दर आहे. शेतकऱ्यांना या हंगामातील शेवटची अपेक्षा तूर व हरभरा पिकावर होती. मात्र, तूरची आधारभूत किंमत 7550 असतांना बाजारात तुरीला 6200 ते 7000 भाव मिळत आहे. दुसरीकडे, हरभऱ्याची आधारभूत किंमत 5650 असताना सध्या 5400 भाव सध्या हरभऱ्याला मिळत आहे. शेतमालाला योग्य दर न मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला असून या सरकारला जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने आयातीला मंजुरी दिल्याने शेतमालाचे भाव कोसळल्याचे  जाणकारांचे मत आहे.

सोयाबीन खरेदीची मुदत उद्या म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे

दुसरीकडे, हमीभावानुसार सुरू झालेल्या शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या म्हणजेच 31 जानेवारीला संपत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांवर मोठ्या संख्येने लागल्या आहेत. आगामी दोन दिवसांत सोयाबीन खरेदी होणे शक्य नसल्याने खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीपूर्व नोंदणी केली. 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई, दी विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, दी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारे तीन अशा यंत्रणाकडून जिल्ह्यात 35 पेक्षा अधिक खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Passenger Plane and Helicopter Collide in America : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Video : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय',  एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaMNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजनBeed Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा दरबार, जिल्हा नियोजन समितीची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Passenger Plane and Helicopter Collide in America : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Video : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय',  एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Embed widget