एक्स्प्लोर

'जरांगेंनी लिमिटमध्ये राहावं, नाहीतर आम्हाला अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल'; प्रवीण दरेकरांचा इशारा

Pravin Darekar : देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर जरांगे जाणार असतील तर आम्हालाही यावर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल, असा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला आहे.

Pravin Darekar on Manoj Jarange Patil : सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर जरांगे जाणार असतील तर आता आम्हालाही यावर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

प्रवीण दरेकर म्हणाले की, मनोज जरांगेंनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते सरकारने दिलेले आहे. आता नेमके जरांगेंना काय हवे आहे.  जरांगेंना देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. यामागचा बोलावता धनी कोण आहे? हे सरकारने शोधण्याची आवश्यकता आहे.

जरांगेंनी लिमिटमध्ये राहावे

उठ सूट मराठा समाजाला काय वाटते, मराठा समाजाने काही सातबारा जरांगेंच्या नावावर केलेला नाही. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर जरांगे जाणार असतील तर आता आम्हालाही यावर अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन द्यावी लागेल, त्यामुळे तुम्ही आपल्या लिमिटमध्ये राहावे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

...तर आम्हाला सागर बंगल्यावर जशाच तसे उत्तर द्यावे लागेल

आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिले. मात्र तुम्ही आता पूर्णपणे राजकारणी झालेले आहात. तुमचं बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. ज्यांनी आपल्या आयुष्याच्या हयातीत मराठा आरक्षण दिले नाही, ते आता तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार म्हणून तुम्ही बोला, मात्र सागर बंगला, देवेंद्र फडणवीस, अशा प्रकारच्या कृती सहन केल्या जाणार नाहीत. आता जरांगे त्रस्त झालेत आणि त्यामुळे ते इतक्या टोकाची भाषा बोलत आहेत. सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला सागर बंगल्यावर जशाच तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल, असे प्रवीण दरेकर म्हणाले. 

काय म्हणाले आशिष शेलार?

मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, याचे भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. ⁠जरांगे पाटील यांच्या मागणीला आम्ही पाठींबा दिलाय. ⁠ज्या करता कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होणे गरजेचे आहे. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची शपथ पूर्ण केली. देवेंद्रजींबद्दल बोलताना विचार केला पाहिजे. त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळतो. मुंबईला ते येऊ शकतात", अशी प्रतिक्रिया आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Narendra Patil on Manoj Jarange : जरांगे पाटलांचा तोल सुटलाय, त्यांचा बोलवता धनी कोण? फडणवीसांवर आरोप होताच भाजप आक्रमक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाबABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सFadnavis vs Danve : शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? देवेंद्र फडणवीसांनी समजावून सांगितलं!Devendra Fadnavis on Shaktipeeth : शक्तिपीठ महामार्ग का गरजेचा? मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, फडणवीस म्हणाले...
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
समृद्धी महामार्गानं गेलं की बायको घरी वाट बघते...एवढा बोगस रस्ता, वडेट्टीवारांचा हल्लाबोल, शक्तिपीठ महामार्गाला विरोध 
Embed widget