'त्या' वक्तव्याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची मागणी, म्हणाले लोकसभेत असाच प्रकार तर केला नसेल?
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन लोक भेटले होते. त्यांनी 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Prashant Bamb on Sharad Pawar : 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Vidhansabha Election) दिल्लीत दोन लोक आपल्याला भेटायला आले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. यावर भाजप आमदार प्रशांत बंब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीमध्ये 160 आमदार निवडून देण्याच्या वक्तव्याप्रकरणी शरद पवार यांची चौकशी करावी, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे. 60 वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवार यांना लोक आठवत नाहीत हे अनाकलणीय असल्याचे बंब म्हणाले.
लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला
अनके वर्षानंतर गावात गेल्यावर लोकांना नावानिशी ओळखणाऱ्या शरद पवारांना भेटायला आलेल्या दोन व्यक्तींची नावं आठवत नाहीत. हे दोन लोक देशद्रोही आहेत. माझा विश्वास नाही की त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता आठवत नाहीत. लोकसभेत असाच प्रकार तर नसेल केला. आता सौदा जमला नसेल. राहुल गांधी, शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची नोंद होते असे बंब म्हणाले. निवडणूक आयोगाने चौकशी करावी. वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करायला हवी असे बंब म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारु असे आम्ही ठरवल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पवारांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते प्रतिवाद करण्यासाठी तातडीने मैदानात उतरले आहेत. भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. (Maharashtra Vidhan Sabha Election 2025)
महत्वाच्या बातम्या:

























