Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Prakash Abitkar & Hasan Mushrif : पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारकीची हॅट्रिक केली आहे.
Prakash Abitkar & Hasan Mushrif : बहुचर्चित आणिबहुप्रतिक्षित असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार आज (15 डिसेंबर) नागपूरमध्ये पार पडला. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये महायुतीकडून 33 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली, तर सहा मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून एकूण 42 मंत्री महायुती सरकारमध्ये असणार आहेत. भाजपकडून 19 जण मंत्रीपदी आहेत. शिवसेनेकडून 11 आणि राष्ट्रवादीकडून 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. दरम्यान, महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांच्या रूपाने एकमेव मुस्लिम चेहरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रथम क्रमांकाची मंत्रिपदाची शपथ हसन मुश्रीफ यांनी घेतली. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मुश्रीफ यांचं स्थान अधोरेखित झालं आहे. दुसरीकडे भाजपकडून पहिल्या क्रमांकावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी प्रथम क्रमांकाची शपथ घेतली.
हमन मुश्रीफांचा मंत्रीपदाचा षटकार!
कागल विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून येण्याचा पराक्रम हसन मुश्रीफ यांनी केला आहे. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या प्रकाश आबिटकर यांनी सुद्धा राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारकीची हॅट्रिक केली आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपद मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला कोणतं खाते येणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. प्रकाश आबिटकर यांची मंत्रीपदी वर्णी लागणार याबाबत माझाने सर्वप्रथम वृत्त दिले होते. त्यामुळे माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रकाश आबिटकर यांनी आज शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब
आबिटकर यांच्या मंत्रीपदाचे सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यांच्या प्रचारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आबिटकरांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि त्यांना मंत्री करण्याची जबाबदारी माझी असेल असा शब्दच दिला होता. तो शब्द त्यांनी प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री करून पूर्ण केला आहे. त्यामुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघाला प्रथमच कॅबिनेट मंत्री रूपाने मंत्रिपद मिळालं आहे. कोल्हापूर जिल्ह्याकडे दोन कॅबिनेट मंत्रीपद आल्याने कोल्हापूरच्या सुद्धा समस्या लवकरात लवकर सुटतील अशी आशा कोल्हापूरची जनता व्यक्त करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या