एक्स्प्लोर
दारुबंदी असलेल्या गडचिरोलीत 1200 पेट्या देशी-विदेशी दारुसाठा जप्त
दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात परप्रांतातून आणलेला दारुसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपीना चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर चार आरोपी फरार झाले आहेत.
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात परराज्यातून आणलेला दारुसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपीना चामोर्शी पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर चार आरोपी फरार झाले आहेत.
गडचिरोलीत दारुबंदी आहे. दारुबंदी लागू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. कंटेनरसह तब्बल 1 कोटी 1 लाख 47 हजारांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोलीत दारुबंदी असली तरी छुप्या मार्गाने परराज्यातून दारु आणली जाते. चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्रीनिवासापूर गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारुसाठा असल्याची गुप्त माहिती चामोर्शी पोलिसांना मिळाली होती.
चामोर्शी पोलिसांनी एक पथक तयार करून सोमवारी रात्री श्रीनिवासापूर गावाजवळ पोलिसांनी शोध घेतले असता, एका शेतातील घराजवळ कंटेनर वाहनासह 7 इसम उभे असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना दिसताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यातील इंदौर येथील वाहन चालक दिनेश डांगे आणि सुभाष धनविजय याला अटक केली, तर यातील चार आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाले.
पोलिसांनी कंटेनरची झडती घेतले असता देशी-विदेशी दारुच्या 1200 पेट्या (57,600 बाटल्या) पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 15 लाखांचं कंटेनर आणि 86 लाख 47 हजाराची दारु असा एकूण तब्बल 1 कोटी 1 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात दारु जप्त करण्याची पहिलीच कारवाई आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement