एक्स्प्लोर

नीरव मोदी प्रकरणामुळे जेटलींवर मोदी नाराज : पृथ्वीराज चव्हाण

नीरव मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर नाराज आहेत. अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णयही ते घेऊ शकतात, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी जेटलींवर नाराज असल्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ शकतात. मात्र जेटलींनी यावर स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या राजीमाम्याची आम्हीच मागणी करु, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे नीरव मोदी प्रकरणी विरोधक मोदींवर निशाणा साधत आहेत. मोदींनी या प्रकरणात अद्याप मौन बाळगलेलं आहे. तर दुसरीकडे मोदी अर्थमंत्री जेटलींवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काय आहे पीएनबी घोटाळा? देशातील सर्वात मोठी दुसरी बँक पंजाब नॅशनल बँकेत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. नीरव मोदी आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे षडयंत्र रचलं. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली. हेच पत्र हाँगकाँगमधल्या अलाहाबाद आणि अॅक्सिस बँकेच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे जे सामान मागवण्यात येत आहे, त्याचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत आहे. पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केले आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं. मात्र बँक अधिकाऱ्यांनी जेवढे पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तेवढी कॅश भरायला सांगितली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं. बँकेने तक्रार दाखल केली असून हे प्रकरण आता सीबीआयपर्यंत पोहोचलं आहे. नीरव मोदीला जारी केलेले आठही लेटर ऑफ अंडरटेकिंग बनावट असल्याचं उघड झालं. पीएनबीचे डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीने एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन हे लेटर जारी केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता 280 कोटी रुपये पीएनबीला चुकते करावे लागणार आहेत. नीरव मोदी कोण आहे? नीरव मोदी भारतातील मोठा हिरे व्यापारी आहे, ज्याला भारतातील 'डायमंड किंग' असंही म्हटलं जातं. 48 वर्षीय नीरव मोदी फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार नीरव मोदीची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे. नीरव मोदीची फाईव्ह स्टार डायमंड नावाची कंपनी आहे. त्याने आपल्याच नावाने म्हणजे नीरव मोदी डायमंड ब्रँड नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरु केले आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदीचे 25 लग्झरी स्टोअर आहेत. नीरव मोदीच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून ते 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नीरव मोदीच्या डायमंड ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदीच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. नीरव मोदीचे वडीलही हिरे व्यापारी आहेत. नीरव मोदीने सुरुवातीचं शिक्षण अमेरिकेत घेतलं. अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला. संबंधित बातम्या : पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार? PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय? PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Akole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget