(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parambir Singh : परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टाचा तुर्तास दिलासा, चार्जशीट दाखल न करण्याचे पोलिसांना आदेश, पुढील सुनावणी 11 जानेवारीला
Parambir Singh Udpate : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं तुर्तास दिलासा दिला आहे. परमबीर यांच्याविरोधात सध्यातरी कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.
Parambir Singh Udpate : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) तुर्तास दिलासा दिला आहे. परमबीर यांच्याविरोधात सध्यातरी कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 11 जानेवारीपर्यंत पुढं ढकलली आहे. परमबीर यांना अटक न करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत आज संपत होती. त्यानंतर परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी आज पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंह यांनी तुर्तास दिलासा मिळाला आहे.
SC ने मुंबई के पूर्व पुलिस कमिश्नर परमबीर सिंह के खिलाफ दर्ज मुकदमे CBI को ट्रांसफर करने का संकेत दिया। सभी पक्षों से 3 हफ्ते में लिखित जवाब के लिए कहा। 11 जनवरी को सुनवाई। परमबीर को गिरफ्तारी से मिली अंतरिम राहत बरकरार रहेगी। फिलहाल पुलिस किसी मामले में चार्जशीट दाखिल नहीं करेगी
— Nipun Sehgal (@Sehgal_Nipun) December 6, 2021
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अटक न करण्याचे आदेश या आधीच्या सुनावणीत दिले होते. अटक न करण्याची मुदत आज संपतअसल्याने या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली. यामध्ये परमबीर सिंह यांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने परमबीर सिंह यांनी तुर्तास अटकेपासून संरक्षण देत तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने न्यायालयात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंहवर नोंदवलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. त्यावर न्यायालयाने सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप केले होते. या आरोपांवरील चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून परमबीर यांनी तीन वेळा चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीसाठी ते गैरहजर राहिले. त्यानंतर बरेच दिवस अज्ञातवासात असणारे परमबीर सिंह चौकशीसाठी हजर झाले. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिल्यानंतर 3 डिसेंबरला परमबीर सिंह यांची ईडीकडून चौकशी झाली.
परमबीर सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खंडणी, फसवणूक यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांवर सध्या तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : देशात 21 ओमायक्रॉन बाधित ! प्रशासन सतर्क, संसदेच्या आरोग्य समितीनं बोलावली बैठक
- Putin India Visit : भारत-रशिया मैत्री आणखी बळकट, पुतिन यांच्या भारत दौऱ्यात 10 मोठे करार
- Wasim Rizvi : वसीम रिझवींनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म, काय आहे कारण, कोण आहेत रिझवी?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha