Omicron Variant : देशात 21 ओमायक्रॉन बाधित ! प्रशासन सतर्क, संसदेच्या आरोग्य समितीनं बोलावली बैठक
Omicron Variant : संसदेच्या आरोग्य समितीने 9 डिसेंबरला ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली. या बैठकीला आरोग्य सचिव आणि आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालकांनाही (ICMR DG) बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.
Omicron Variant Update : संसदेच्या (Parliament) आरोग्य समितीचे अध्यक्ष राम गोपाल यादव (Ramgopal Yadav) यांनी 9 डिसेंबर रोजी ओमायक्रॉनबाबत (Omicron) बैठक बोलावली आहे. या बैठकीला आरोग्य सचिव आणि आयसीएमआरचे व्यवस्थापकीय संचालकांना (ICMR DG) देखील बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. देशाच्या विविध भागांतून कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असून बाधितांची संख्या आता 21 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात सापडले होते.
देशात 21 जणांना ओमायक्रॉनची लागण
देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या आता 21 झाली आहे. रविवारी एका दिवसात ओमायक्रॉनचे नवे 17 रुग्ण देशात आढळून आले. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9, महाराष्ट्रात 7 आणि राजधानी दिल्लीमध्ये 1 या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. राजस्थानचे वैद्यकीय सचिव वैभव गलरिया यांनी सांगितले की, संक्रमित लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे नऊ जणांना ओमायक्रॉन या नवीन कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. तर, पुणे जिल्ह्यातही सात जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या देशात राजस्थानमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक 9 रुग्ण, महाराष्ट्रात 8, कर्नाटकात 2 रुग्ण तसेच दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क
ओमायक्रॉनमुळे सरकार सर्तक झालं असून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी दिल्लीच्या IGI विमानतळावर RT-PCR चाचणी आणि सुविधांचा आढावा घेतला. ओमायक्रॉन कोरोनाचे आतापर्यंतचे सर्वात धोकादायक प्रकार असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, अद्याप या व्हेरियंटमुळे जगात कोणताही मृत्यू झालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ओमायक्रॉन कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक आहे आणि तो इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरतो, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधित, तर 21 ओमायक्रॉनचे रुग्ण
- Putin India Visit : भारत-रशिया मैत्री आणखी बळकट, पुतिन यांच्या भारत दौऱ्यात 10 मोठे करार
- शाळा सुरु करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार होण्याची शक्यता; शिक्षणमंत्र्यांचे संकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha