एक्स्प्लोर
पनवेलमध्ये मतमोजणी कशी होणार?
![पनवेलमध्ये मतमोजणी कशी होणार? Panvel Mahapalika Election 2017 पनवेलमध्ये मतमोजणी कशी होणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/22172315/panvel-palika.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: भिवंडी आणि मालेगावस पनवेल महापालिकेसाठीही आज मतमोजणी होत आहे.
पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झालं असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
पनवेलमध्ये, 20 प्रभाग 78 जागा (18 प्रभागात 4 जागा तर 2 प्रभागात (3-3) 6 जागा)
४ टप्प्यांत मतमोजणी
पनवेलमध्ये मतमोजणीला सकाळी 10 पासून सुरुवात होणार आहे. यामध्ये प्रभागानुसार कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 4 फेऱ्या होतील.
पहिल्या फेरीचे निकाल सकाळी 11 वाजता तर अंतिम निकाल दुपारी 1.30 ते 2 वाजता लागणार असल्याची माहिती पालिका आयुक्त निंबाळकर यांनी दिली.
6 ठिकाणी मतमोजणी
मतमोजणी केंद्रांची नावे
१, २, ३ नावडे हायस्कूल
४, ५, ६ डी. ए. व्ही. स्कूल, खारघर
७, ८, ९, १० काळभैरव सभागृह, कळंबोली
११, १२, १३ रयत शिक्षण शाळा, कामोठे
१४, १५, १६ के. व्ही. कन्याशाळा, पनवेल
१७, १८, १९, २० विखे हायस्कूल, पनवेल
नवी मुंबईतील ६५० पोलीस कर्मचारी, ट्रॅकिंग फोर्स, राज्य राखीव पोलीस (एसआरपी) तैनात आहेत.
सहा मतमोजणी केंद्रांवर २० पोलीस निरीक्षक, १०० पोलीस उपनिरीक्षक, १ साहा. पोलीस आयुक्त आणि ६५० पोलीस कर्मचारी यांचा पहारा राहणार आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश निलवाड यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)