एक्स्प्लोर

पुढच्या दसरा मेळाव्याला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवतील : पंकजा

अहमदनगर : "पुढच्या दसऱ्याला भगवानगडाच्या गादीवर बसलेले महंतच मला मुलगी म्हणून बोलवणार आहेत, याचा मला विश्वास आहे," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी वादावर भाषण केलं. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गडाच्या पायथ्याखाली घेतलेल्या सभेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी नामदेवशास्त्रींची भेट घेण टाळलं. पंकजा मुंडे आज आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह भगवानगडावर पोहोचल्या. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडवर उतरल्यानंतर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी भगवानगडापर्यंत खास रथातून रॅलीही काढली. यावेळी पंकजा यांचे पती अमित पालवे, राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि रासप नेते महादेव जानकर, पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह दिग्गज नेत्यांची हजेरी होती. पंकजा मुंडे यांना रॅलीतून भगवानगडावर पोहोचायला जवळपास पाऊण ते एक तास लागला. वाटेत पंकजा समर्थकांनी पंकजांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. त्यामुळे आख्खा भगवानगड आज पंकजामय झाल्याचं वातावरण दिसत होतं. यंदाचा दसरा मेळावा हा नेहमीप्रमाणे गडावर न होता पायथ्याशी झाला. भगवानगडाचे मंहत नामदेवशास्त्री यांच्यासोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना गडावर नाही तर पायथ्याखाली सभा घ्यावी लागली. 'भगवानगडाचं आणि माझं बाप-लेकीचं नातं' मात्र पुढच्या दसरा मेळाव्या भगवानगडाच्या गादीवर बसलेले महंत मला मुलगी म्हणून बोलवणार आहेत, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मी लेक म्हणून भगवानगडावर येणार आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवानगडाचं आणि माझा बाप-लेकीचं नातं आहे. वडिलांच्या अस्थी गडावर आणल्या तेव्हाच भगवानगडाची लेक झाले. गडाला बाप मानलं, त्याच्याविरोधात अवाक्षरही काढणार नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. 'माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न' भ्रष्टाचार, धमक्या दिल्याच्या खोट्या ऑडिओ क्लीप व्हायरल करुन मला घेरण्याचा आणि माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न असल्याचा सनसनाटी आरोप पंकजा मुंडेंनी भगवानगडावर केला. अर्थातच यावेळी त्यांनी नामदेवशास्त्री किंवा धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेणं टाळलं. पण माझा राजीनामा लिहून हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, असं उत्तर यावेळी पंकजांनी दिलं. 'माझ्यामुळे भावांना लाल दिवा' महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि राम शिंदे या माझ्या भावांना माझ्यामुळेच लाल दिवा मिळाल्याचा खुलासा पंकजांनी यावेळी केला. इतकंच नाही तर बंधू राम शिंदे कॅबिनेट मंत्री झाले, केवळ मंत्रीच नाही तर माझ्या खात्याचा वारसा त्यांना दिला, असंही पंकजांनी नमूद केलं. माझ्यामुळेच माझ्या भावांना लाल दिवा मिळाल्याचा खुलासाही पंकजांनी केला. शिवाय मी माझ्या लेकरांसाठी अंहकाराचा बुरुज उतरुन आले, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढच्या दसरा मेळाव्याला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवतील : पंकजा - मला उन्हाचे चटके बसत नाहीत, कारण तुमच्या प्रेमाची सावली माझ्यावर आहे : पंकजा मुंडे - मी तुमची देवता नाही, माता आहे : पंकजा मुंडे - माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे : पंकजा मुंडे - माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनामा मागण्यांवर पंकजा मुंडेंची टीका - हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवून टाका : पंकजा मुंडे - तुमच्या हातातला कोयता फक्त ऊसतोडणीसाठी वापरा, दुसऱ्या कामांसाठी नको : पंकजा मुंडे - मी मंत्री नंतर, आधी भगवान बाबांची भक्त : पंकजा मुंडे - मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे : पंकजा मुंडे - मी अहंकार आणि कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले : पंकजा मुंडे - गडाला बाप मानलं, त्याच्याविरोधात बोलणार नाही : पंकजा मुंडे - वडिलांच्या अस्थी गडावर आणल्या तेव्हाच भगवानगडाची लेक झाले : पंकजा मुंडे - भगवानगडाचं आणि माझं नात बाप-लेकीचं : पंकजा मुंडे - गोपीनाथ साहेबांनी भगवानगडावरुन शेवटचं भाषण करताना वारसा सोपवला : पंकजा मुंडे - माझे बंधू राम शिंदे कॅबिनेट मंत्री झाले, केवळ मंत्रीच नाही तर माझ्या खात्याचा वारसा त्यांना दिला : पंकजा मुंडे - महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि राम शिंदे या माझ्या सगळ्या भावांना माझ्यामुळे लाल दिवा : पंकजा मुंडे - भगवानगडावर शक्तीप्रदर्शन नव्हे तर भक्तीप्रदर्शन, इथे भगवान बाबांचं दर्शन महत्त्वाचं, महंतांच नाही : एकनाथ खडसे - भगवानगडाबाहेर पंकजा समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, परिस्थिती नियंत्रणात, पंकजांचं समर्थकांना शांतता राखण्याचं आवाहन - पंकजा मुंडेंकडून भगवानबाबांचं दर्शन, मात्र नामदेव शास्त्रींची भेट घेणं पंकजांनी टाळलं LIVE_2 - पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचल्या, पंकजा समर्थकांची गडावर प्रचंड गर्दी - भगवानगडावर सर्वसामान्यांसाठी दर्शन बंद, दर्शन बंद करण्याची भगवान गडाच्या इतिहासात पहिलीच वेळ Pankaja_Bhagwangad पंकजा मुंडे पती अमित पालवे यांच्यासह भगवानगडावर दाखल झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोविंद केंद्रेही उपस्थित होते. पंजकांचे समर्थकही मोठ्या संख्येने गडावर दाखल झाले आहेत. याआधी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दरम्यान, नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील भाषणाच्या वादावादीनंतर आज काय परिस्थिती असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. - पंकजा मुंडे पती अमित पालवे यांच्यासह भगवानगडावर दाखल, त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोविंद केंद्रेही उपस्थित ---------------- अहमदनगर : पंकजा मुंडे आज भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेणार आहेत. नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंच्या भगवानगडावरील भाषणाच्या वादावादीनंतर आज काय परिस्थिती असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास त्या भगवानगडावर पोहचतील. गोपीनाथ गड ते भगवान गड अशी रॅली काढण्यात येणार असून प्रीतम मुंडे त्याचं नेतृत्व करणार आहेत. पंकजा मुंडेंना भगवान गडाच्या पायथ्याशी सभा घेण्याची परवानगी काल मिळाली. त्यामुळे भगवान गडावर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाल्याचं म्हटलं जात आहे. गडाच्या मालकीच्या जागेशिवाय अन्यत्र सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडाच्या पायथ्याशी गेट नंबर 22 वर पंकजांची सभा होईल.

पंकजा मुंडेंना दिलासा, दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी

पंकजा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन भाविकांना भगवान गडावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भगवानगड आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. https://twitter.com/Pankajamunde/status/785511253074583553

EXCLUSIVE: नामदेव शास्त्रींसोबत कोणताही वाद नाहीः पंकजा मुंडे

भगवान बाबा आणि गडाचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य कोणी करणार नाही. तसंच महंत नामदेव शास्त्री आणि आपल्यात कसलाही वाद नाही. त्यामुळे गडावर येणाऱ्या लाखो भाविकांशी संवाद साधायला नक्की आवडेल. भगवान गड हा राजकीय भाषणासाठी नाही, त्यामुळे गडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संबंधच नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलं होतं. या मुलाखतीनंतर हेलिपॅड परिसरात सभेला मान्यता मिळाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget