एक्स्प्लोर
Advertisement
पंकजा मुंडेंचा परळी तालुक्यात 'गाव तिथे विकास' दौरा
पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत.
बीड : जिल्हा परिषद निवडणुकीत परळी तालुक्यातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतः मतदारांनीच हा वचपा काढला, असं मत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.
पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यात ‘गाव तिथे विकास’ दौऱ्याला आजपासून सुरुवात केली. या दौऱ्याला खोडवा सावरगाव येथून प्रारंभ झाला. गावोगावी जाऊन पंकजा मुंडे जनतेशी संवाद साधत आहेत.
परळीत भावना आणि विश्वासाच्या जोरावरच निवडणूक लढवता येऊ शकते, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे नेहेमीच सांगायचे. दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या जोरावर निवडणुका जिंकणं अशक्य आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसमोर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचं आव्हान आहे. त्यातच आता शिवसेनेनेही परळीतून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने यावेळची निवडणूक आणखी चुरशीची होईल, यात काही शंका नाही. त्यापूर्वी पंकजा मुंडेंनी गावोगावचा दौरा सुरु केला आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेनाही परळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार
खुर्ची टिकवण्यासाठीचे निर्णय घेणं बंद करा : पंकजा मुंडे
विधानपरिषदेत पंकजा आणि धनंजय मुंडेंची एकमेकांवर स्तुतीसुमनं!
विरोधीपक्ष आणि पालकमंत्री एकत्र आल्यास महालक्ष्मीची पूजा करेन : चंद्रकांत पाटील
... तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, पंकजांचं धनंजय मुंडेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement