एक्स्प्लोर
भगवानगडावर पंकजा मुंडेंचे भाषण होणारच?
![भगवानगडावर पंकजा मुंडेंचे भाषण होणारच? Pankaja Munde Speech On Bhagwangad भगवानगडावर पंकजा मुंडेंचे भाषण होणारच?](https://static.abplive.com/abp_images/421746/thumbmail/Pankaja%20Munde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: गेल्या काही दिवसांपूर्वी भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये चांगली जुंपली होती. भगवान गडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इसारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री सानप यांनी घेतली होती.
पण आता पंकजा मुंडेच्या भाषणसाठी भारजवाडी ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. भाजरवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी मंडलेल्या ठरावास विरोध करत, पंकजा मुंडेंना भाषण करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रमपंचायतीतील 9 पैकी 7 सदस्यांनी भाषणाला परवानगी देण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यास भगवान गडावर येण्याचं भारजवाडी सरपंचांचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा तीढा अधिकच वाढला आहे.
पंकजांना भगवानगडावर राजकीय भाषण करता येणार नाही: नामदेवशास्त्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)