Pandharpur | वासुदेव महाराज चवरे गुरुजी यांचे निधन
आयुष्यभर निष्काम सेवेला महत्व देऊन काम करणाऱ्या वासुदेव महाराज चवरे गुरुजी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
पंढरपूर : श्रीगुरु आंबेकर आजरेकर फड मालक गुरु ह. भ. प. वासुदेव चवरे गुरुजी यांचे मंगळवारी कृष्ण दशमीला दुपारी 12.45 वा. क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. चवरे महाराज यांनी शेती सांभाळून शिक्षण क्षेत्रात नोकरी केली आणि फड परंपरा सेवा सांभाळली. त्यांनी आयुष्यभर निष्काम सेवेला महत्व देऊन किर्तन ,प्रवचन सेवा केल्या होत्या .
"माझ्या वडिलांची मीरासी गा देवा | तुझी चरण सेवा पांडुरंगा ||" या संत उक्तीप्रमाणे सेवाभावी त्यांची वृत्ती होती. शांत व प्रेमळ स्वभाव असल्यामुळे अनेकांना वारकरी परंपरेमध्ये घेऊन यांच्याकडून सेवा करून घेतली संत वचन प्रमाण मानून वारकरी परंपरेतील सर्व सेवा स्वतःही केल्या व इतरांकडून ही करून घेतल्या. त्यांना वयाच्या 86 व्या वर्षांपर्यंत अभंगाचे व ओवीचे स्मरण होते. शेवटी-शेवटी त्यांना व्यावहारिक विस्मरण होत होते पण अभंगाचे विस्मरण कधीच झाले नाही. वारकरी परंपरेच्या सर्व सेवा निष्ठेने पूर्ण केली प्रारब्धरुपी संसार करून शुद्धभावाने परमार्थ केला. ह.भ.प.भागवत महाराज चवरे यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले , एक मुलगी, चार सुना, नातू, पणतू
असा परिवार आहे.
महत्वाच्या बातम्या :