एक्स्प्लोर

Bhandup Dream Mall Fire : भांडूप कोविड सेंटर अग्नितांडव प्रकरणी प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे अटकेच्या भीतीनं हायकोर्टात

एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांनी घटनेनंतर अटकेच्या भीतीपोटी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे.

मुंबई : मुंबईच्या भांडुप परिसरातील ड्रीम्स मॉलमधल्या कोविड सेंटरला आग लागली होती. या प्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदे लवादा(एनसीएलटी) कडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही, असं आश्वासन मंगळवारी मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दिलं आहे.

ड्रीम्स मॉलमध्ये 25 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत मॉलमधील 'सनराईज' रुग्णालयातील 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राहुल सहस्त्रबुद्धे यांनी घटनेनंतर अटकेच्या भीतीपोटी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. त्यावर मंगळवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सहस्त्रबुद्धे यांना एनसीएलटीकडून नियुक्त करण्यात आलं आहे. ड्रिम्स मॉल आणि रुग्णालय प्रशासनं अग्नीसुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याचं त्यांनी एनसीएलटी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाला कळवलं होतं, असा दावा त्यांच्याकडनं करण्यात आला आहे.

सहस्त्रबुद्धे यांना पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात पोलिसांकडून समन्स पाठविण्यात आलं आहे. सहस्त्रबुद्धे त्यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केलं असून कर्तव्य बजाविण्यातही ते अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं पत्र सनराईज रुग्णालयाने पोलिसांना दिलं आहे. मात्र मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सहस्रबुद्धे यांना अद्याप आरोपी केलेलं नाही, त्यामुळे तूर्तास सहस्त्रबुद्धे यांना अटक करण्याची गरज नाही असं आश्वासन पै यांनी न्यायालयाला दिलं. याची दखल घेत हायकोर्टानं सुनावणी गुरूवारपर्यंत तहकूब केली. 

मॉलचे संचालक आणि नेमलेले प्रशासकिय अधिकारी यांनी मॉलमध्ये तसेच सनराईज रुग्णालयात सुरक्षेच्या उपाययोजना, सुरक्षेच्या परवान्यामध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक होतं. तिथली अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही?, याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचं होते. परंतु, त्यांनी याची योग्य ती खबरदारी न घेतल्यानं 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget