एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: मी पंचगंगा बोलतेय! पंचगंगेचं हवेतून दर्शन, माझाचा विशेष रिपोर्ट
कोल्हापूर: मी कोल्हापूरची... पंचगंगा... विस्तीर्ण, विक्राळ आणि अथांग....
हे माझंच पात्र आहे. यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे. पण 4 दिवसांच्या मुसळधार पावसानं मी अशी काही विस्तारले. की माझ्या काठावरच नव्हे तर माझ्य़ापासून अंतर ठेवणाऱ्यांनाही मी कवेत घेतलं.
रंकाळाच पाहा, एरव्ही मी रंकाळ्याशी अंतर ठेऊन असते. पण यंदा मी रंकाळ्याशीही सलगी केली. आता हा माझ्यावरचा प्रसिद्ध घाट पाहा. म्हणजे पाण्यात तो दिसत नाही. पण त्याशेजारी असलेल्या मंदिरांची गोपुरेच माझ्यातून डोकावत आहेत.
त्या शेजारीच असलेल्या हा शिवाजी पूल आणि त्याच्या शेजारचा नवा पूल. या पुलांवर पाणी आलं. तर कोल्हापूर बुडतं असं म्हणतात. ब्रिटिशांच्या काळात बांधलेला हा पूल आजतागायत बुडलेला नाही. पण त्याचं अस्तित्व या पात्रासमोर अत्यंत खुजं ठरतं आहे.
कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जाणारा हा रस्ता. मी आणखी थोडी पातळी वाढवली असती. तर हाही पाण्याखाली गेला असता. पण रस्त्याला अभिषेक घालून मी त्याचा निरोप घेतला. रस्त्यावरच्या पाण्यातून वाट काढणारी वाहनं जणू मला होड्याच वाटत आहेत.
रस्त्याशेजारीच असलेले हॉटेल्स आणि पेट्रोलपंप हे माझ्या पुराच्या धोक्यापासून किती जवळ होते याची कल्पना येईल. आंबेवाडीला तर एका बेटाचं रुप आलं होतं. हे गाव माझ्यापासून काही किलोमीटर लांब असूनही इच्छा नसतानाही माझ्या विळख्यानं आंबेवाडीचं बेट झालं.
आता जरा शहरात येऊ. छत्रपतींच्या न्यू पॅलेसपासून बऱ्याच अंतरावरून मी वहायचे. पण यंदा मी राजेंनाही कुर्निसात घातला. कधी नव्हे ते माझं पाणी राजवाड्यातल्या शाळेच्या भिंतींना लागलं.
मला चिंता तेव्हा वाटली. जेव्हा मी राजवाड्याशेजारीच झालेल्या बांधकामांच्या भिंतींना माझं पाणी लागलं तेव्हा. पुरामध्ये मी विस्तारणार हे माहित असतानाही माझ्या हक्काच्या जमिनीमध्ये कोल्हापूरकरांनी बांधकामं का केली?
कधीकाळी इथं जंगल होतं. थोडी शेती होती. मी पावसात इथं यायचे पण कुणालाही त्रास न देता जायचे. पण आज इच्छा नसतानाही, माझ्याच काठावर वाढलेल्यांना मला इच्छा नसतानाही त्रास द्यावा लागतो.
संस्कृती फुलते ती नदीकिनारीच. पण पूर्वी माझ्या सीमारेषा पाळल्या जायच्या. माझा सन्मान केला जायचा. पण आज हव्यासापोटी माझे किनारे ओरबाडले जात आहेत. माझ्या हक्काच्या जमिनी घशात घातल्या जात आहेत. तेव्हा माझा आदर करायला शिका. माझ्या सीमारेषा जपा. अन्यथा... मी एक दिवस आपल्या हक्काची जमीन कायमची परत मिळवेन.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement