एक्स्प्लोर
Advertisement
धक्कादायक! पालघर हत्याकांडातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह
पालघर जिल्ह्यांत कोरोना बाधितांचा आकडा 170 वर पोहोचला असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बाधितांपैकी 59 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पालघर : पालघर जिल्ह्यातील डचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणातील अटकेत असणाऱ्या आरोपींपैकी जवळपास 20 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पालघर हत्याकांडातील एका आरोपीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचं समोर आलं आहे. 28 एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले होते तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आरोपीचा शनिवारी सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल सर्जन कांसन वानेरे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचं देखील समजते आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वाडा पोलीस कोठडीत त्याला इतर 20 आरोपींच्या समवेत एकाच कोठडीत ठेवण्यात आले होते. तसेच चार दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे अद्याप सुरु आहे.
आतापर्यंत सोबतचे आरोपी आणि इतर अशा 44 जणांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. सध्या पालघर जिल्ह्यासाठी ही चिंता वाढविणारी बाब समोर आली आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 170 वर पोचली आहे या पैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 59 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 2691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 188 रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. या मध्ये पालघर ग्रामीण मध्ये कोरोना बाधितांची संख्या 27 झाली असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
Palghar Mob Lynching | पालघर हत्याकांड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून अहवाल मागवला
दरम्यान गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी 5 जणांना अटक केली आहे. अटक आरोपी हे सर्वजण गडचिंचले येथील राहणारे असून त्यामध्ये 2 आरोपी 60 वर्षीय आहेत. या आरोपींना डहाणू न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील, गडचिंचले येथे जमावाने 2 साधू व त्यांचा चालक यांची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी आधीच 101 जणांना अटक झाली असून, आता खूनाच्या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या 106 झाली आहे. त्याव्यतिरिक्त, गुन्ह्यात सहभागी असलेल्या 9 अल्पवयीन मुलांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत असून कासा पोलिस स्टेशनचे 2 अधिकारी व 5 अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे तर या पोलिस स्टेशनच्या 35 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement