एक्स्प्लोर
पालघरमध्ये सेना आज अर्ज भरणार, भाजप अजूनही तळ्यात-मळ्यात
कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत की काय? अशी शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.
पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेने दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे भाजपचा अजून उमेदवारही निश्चित होताना दिसत नाही.
शिवसेनेचा उमेदवार निश्चित
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना अज्ञातस्थळी ठेवलं आहे. श्रीनिवास वनगा आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भाजप अजूनही संभ्रमात
पालघर लोकसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. कारण चिंतामण वनगा हे भाजपकडून खासदार होते. मात्र भाजपच्या दुर्लक्षामुळे चिंतामण वनगाचे पुत्र श्रीनिवास यांनी मनगटाला शिवबंधन बांधून घेतलं. त्यानंतर भाजपला जाग आली आणि धावपळ सुरु झाली. शिवसेनेच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपची मोठी कोंडी झाली आहे.
'वर्षा'वर खलबतं
पालघर पोटनिवडणुकीत उमेदवार निश्चितीवरुन भाजपमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे. पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा, आमदार पासकल धानोरा, मनीषा चौधरी आणि स्थानिक पदाधिकारी हे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भाजपचं काय ठरलं?
10 मे रोजी भाजपचा उमेदवार अर्ज भरेल, असे बैठकीत ठरले. मात्र उमेदवाराच्या नावावर निर्णय झाला नाही. उमेदवार निश्चित करण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. जो उमेदवार मुख्यमंत्री निवडतील, त्याला निवडून आणण्याचा ठराव पालघरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी एकमताने केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आज पालघरमध्ये
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज पालघरमध्ये असणार आहेत. त्यामुळे ते तिथे काय हालचाली करतील, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण आज दानवे पालघरमध्ये आहेत आणि दुसरीकडे आजच शिवसेनेकडून श्रीनिवास वानगा अर्ज दाखल करणार आहेत.
'नॉट रिचेबल' राजेंद्र गावित भाजपचे उमेदवार?
कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत की काय? अशी शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. एकीकडे भाजप उमेदवाराच्या शोधात असताना, राजेंद्र गावित नॉट रिचेबल असणं, हा केवळ योगायोग आहे की नव्या समीकरणांची नांदी आहे, हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईलच.
28 मे रोजी मतदान
चिंतामण वानगा यांच्या निधानाने पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेचं अजूनही वेट अँड वॉच!
श्रीनिवास वनगांच्या उमेदवारीवर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement