एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पालघरमध्ये खासगी वाहनातून ईव्हीएमची वाहतूक
याप्रकरणात अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावरील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पालघरच्या चिंचरे गावातील 17 नंबरच्या मतदान केंद्रावरील या मतपेट्या होत्या. किराट गावातील काही दक्ष नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला.
याप्रकरणी निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांना नागरिकांनी गाडी अडवून जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
याप्रकरणात अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत.
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मतपेट्या वाहून नेण्यासाठी सरकारी वाहने आणि चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं, निवडणूकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र त्याला फाटा दिल्याचं आजच्या घटनेने समोर आलं आहे.
बूथ क्र.17 चिंचरेमधील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरिकांनी समोर आणला. या मतपेट्या खासगी वाहन क्रमांक एम एच 03 ,बीएस 0980 मधून नेल्या जात होत्या.
आधीच मतदानावेळी अनेक ईव्हीएम बंद पडल्याने, निवडणूक प्रक्रियेवरच विरोधकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. त्यातच असे प्रकार घडल्याने, अनेक संशय व्यक्त केले जात आहेत.
पालघरमध्ये 46.50 टक्के मतदान
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील 7 उमेदवारांचे भवितव्य मतदान मतपेटीत बंदिस्त झाले. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 46.50 टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. मतदानादरम्यान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.
या मतदारसंघात 17 लाख 31 हजार 77 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 7 हजार 400 पुरुष तर 8 लाख 23 हजार 592 स्त्री, इतर 85 मतदार आहेत.
22 अ. ज. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच VVPAT मशिनचा वापर करण्यात आला. मतदानास प्रारंभ झाल्यानंतर या मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या संबंधित ठिकाणी तात्काळ नवीन मशिन उपलब्ध करुन देण्यात आल्या. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु करण्यात आली होती.
संबंधित बातम्या
पालघर पोटनिवडणूक : सात उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement