एक्स्प्लोर

Osmanabad News : अखेर व्हायरल व्हिडीओप्रकरणी 'त्या' महिला कंडक्टरचे निलंबन मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश 

Osmanabad News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे  निलंबन मागे घेण्यात आलं आहे.

Osmanabad News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे  निलंबन मागे घेण्यात आलं आहे. या लेडी कंडक्टरला ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणं चांगलचं महागात पडलं होतं. याप्रकरणी एसटी महामंडळानं संबंधित महिला कंडक्टरला निलंबित केलं  होतं. मात्र, महामंडळानं अखेर हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल सागर गिरी (Mangal Giri) असं या कंडक्टरचं नाव आहे. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत.  

कामावर रुजू राहण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांनी दिले आहेत

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केली म्हणून मंगल गिरी यांच्यावर कारवाई केली होती. मंगल सागर गिरी यांच्याबरोबर वाहक कल्याण कुंभार यांचे निलंबन देखील एसटी महामंडळाने मागे घेतलं आहे. त्यांना 13 ऑक्टोबरपासून कामावर रुजू होण्याचे आदेश आगार व्यवस्थापकांनी दिले आहेत. लेडी कंडक्टरचे निलंबन केल्यानंतर एसटी महामंडळवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. निलंबित लेडी कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. स्वतःचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केलेप्रकरणी ही निलंबन कारवाई करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय?

ड्युटीवर असताना रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला कंडक्टर मंगल सागर गिरी यांना चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळाने या महिला कंडक्टरला निलंबित केलं होतं. गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केलं होतं. कल्याण कुंभार असं वाहतूक कंट्रोलरचं नाव होते. आहे.  

निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात. परंतू, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करुन तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. स्वतःचे व्हिडीओ बनवून एस टी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळं एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या:  

कंडक्टरच्या गणवेशातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणं पडलं महागात, महिला कंडक्टर निलंबित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : 6 AM : 09 Jan 2024 : टॉप शंभर बातम्या : Superfast News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP MajhaSpecial Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Homes : सिडकोनं  26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक  झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...
घरांच्या किमती कमी करा, अन्यथा पैसे परत द्या, सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच अर्जदारांमध्ये नाराजीचा सूर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Embed widget