(Source: ECI/ABP News/ABP Majha)
One Station One Product Project : केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोकणात, बचत गटाच्या महिलांना मिळणार बाजारपेठ
One Station One Product Project : बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या नावीन्यपूर्ण वस्तूंसाठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि कणकवली रेल्वेस्टेशनवर राबविण्यात येत आहे.
One Station One Product Project : केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' हा उपक्रम कोकणात पहिल्यांदाच कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वे स्टेशनवर राबविण्यात येत आहे. बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या नावीन्यपूर्ण वस्तूंसाठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाचा हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ही एक नवी संधी उपलब्ध झाली असून, या अंतर्गत महिलांना निश्चितच चांगल्या प्रकारे रोजगार मिळेल आणि पर्यटनाला चालना देखील मिळेल. शिवाय देशभरातील पर्यटक रेल्वे मार्गाने प्रवास करत असतात अशावेळी पर्यटकांच्या माध्यमातून या उपक्रमाला आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे या प्रकल्पातील अधिकाऱ्यांचे मत आहे.
One Station One Product Project : बचत गटाच्या महिलांना मिळणार बाजारपेठ
बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या नावीन्यपूर्ण वस्तूंसाठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ आणि कणकवली रेल्वेस्टेशनवर राबविण्यात येत आहे. आज कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ही एक नवी संधी उपलब्ध झाली आहे.
One Station One Product Project : कुडाळ आणि कणकवली रेल्वे स्टेशनची निवड
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' या उपक्रमासाठी जिल्ह्यातील कुडाळ व कणकवली या रेल्वे स्टेशनची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. कुडाळ तालुक्यातून 37 स्वयंसहायता बचत गटांना 15 दिवसांच्या रोटेशन पध्दतीने आपआपल्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला याठिकाणी विक्री करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गटांतील महिलांना आपापल्या उत्पादीत केलेल्या मालाला याठिकाणी विक्री करता येणार आहे.
One Station One Product Project : कणकवली रेल्वेस्टेशनवरही होणार प्रकल्प
कुडाळ तालुक्यातून 37 स्वयंसहायता समूह गटांची यासाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच हा उपक्रम कणकवली रेल्वेस्टेशनवर सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील वस्तू देशभरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहेत. त्यामुळे यातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना याठिकाणी विक्री करता येणार आहे.
One Station One Product Project : बचत गटांना फायदा होणार
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून या 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' हा उपक्रमाच्या माध्यमातून बचत गटांना फायदा होणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना याठिकाणी विक्री करता येणार आहे. 15 दिवसांनी दुसऱ्या बचत गटाला याठिकाणी वेगळ्या प्रकारच्या उत्पादनांना विकता येणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' हा उपक्रमाचा जिल्ह्यातील बचत गटांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या