एक्स्प्लोर
ठाण्यात एक कोटी 40 हजार रुपयांची रोकड जप्त, सर्व नोटा 2 हजारच्या

ठाणे : ठाण्यात एक कोटी 40 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्व 2 हजारच्या नोटांचा समावेश आहे. ठाणे पोलिसांच्या युनिट एकने ही कारवाई केली असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
नोटाजप्तीची राज्यातील दिवसभरातील ही तिसरी कारवाई आहे. नवी मुंबईत तब्बल 23 लाख 70 हजारांची तर उल्हासनगरमध्ये 9.76 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रकमेत सापडलेल्या सर्व नोटा या दोन हजार रुपयांच्या आहेत.
नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या सेक्टर 14 मध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. पैशांबद्दल कुठलंही समाधानकारक उत्तर देता न आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
उल्हासनगरमध्ये तीन व्यापाऱ्यांकडे मिळून 9 लाख 76 हजार रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या आहेत. आंचल पॅलेस हॉटेलजवळ काही लोक मोठ्या रकमेसह येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं. ही घटना 9 डिसेंबरची असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातमी : नवी मुंबईत 23 लाख, उल्हासनगरमध्ये 9.76 लाखांच्या नव्या नोटा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
