Pune Sppu News : फी वाढीविरोधात विद्यार्थी पुन्हा एकत्र; 11 ऑक्टोबरला ' कॉफी विथ स्टुडंट्स ' कार्यक्रमातून मोठ्या आंदोलनाचा इशारा
Coffee with Students : काहीही निर्णय न घेतल्यास 11 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
![Pune Sppu News : फी वाढीविरोधात विद्यार्थी पुन्हा एकत्र; 11 ऑक्टोबरला ' कॉफी विथ स्टुडंट्स ' कार्यक्रमातून मोठ्या आंदोलनाचा इशारा On October 11 the Coffee with Students program warned of a major movement in sppu Pune Sppu News : फी वाढीविरोधात विद्यार्थी पुन्हा एकत्र; 11 ऑक्टोबरला ' कॉफी विथ स्टुडंट्स ' कार्यक्रमातून मोठ्या आंदोलनाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/8536b6a94533cb6e4e09d06659c387971664885928940442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Sppu News : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील (savitribai phule pune university) विद्यार्थ्यांचा फी वाढीविरोधात लढा कायम आहे. आंदोलनानंतर (Pune)आता विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने पुणे विद्यापीठात ' कॉफी विथ स्टुडंट्स ' या कार्यक्रमात फी वाढी विरोधात चर्चा केली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आणि विधी अभ्यासक असिम सरोदे उपस्थित होते. काहीही निर्णय न घेतल्यास 11 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्वांना संधीची समानता असेल, मोफत शिक्षण असेल आणि देशाच्या सर्व नागरिकांना आपला विकास करण्याचा अवकाश मिळेल असे अभिवचन जनतेला दिले गेले होते, परंतु आज अवाजवी फी वाढीने कितीतरी वंचित समुहांसाठी शिक्षणाची दारे आधीच बंद करण्यात आली आहे. सावित्रीबाईंचे नाव असलेल्या विद्यापिठात हे होऊ नये यासाठीच मी स्वतः आपल्यासोबत या लढ्यात सामील आहे' असे मत डॉ. बाबा आढाव यांनी मांडले. कोविड काळानंतर विद्यापीठाने सर्व कोर्सेस ची फी दुपटीने वाढविल्या आहेत. हे अत्यंत अन्याय्य आहे आणि आपल्या सर्वसामान्यांच्या शैक्षणिक हक्काला हरताळ फासणयाचे धोरण असल्याचे मत विधी तज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.
काय आहे विद्यार्थ्यांच्या समस्या?
याप्रसंगी वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मिळत नाही, फी वाढ असह्य आहे अशी खंत व्यक्त केली. येत्या 11 ऑक्टोंबर विविध समविचारी पक्ष संघटनांचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्या त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. coffee with students या कार्यक्रमाला बाबा आढाव , असीम सरोदे व इतर समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यामुळे शुल्क वाढ आंदोलनाला बळ मिळाले आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. शुल्कवाढ आंदोलन हे सर्व विद्यार्थ्यांच्याचे आंदोलन आहे . आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षात घेता येत्या 11 तारखेला एक व्यापक आंदोलन तयार होईल, असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आंदोलनं?
विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा नियंत्रक विभागाच्या कार्यालयावर धडक मारली होती. आंदोलकांना रोखण्यासाठी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यानंतरही प्रवेशद्वारावरून उडी मारत, सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी धडक मारली. पुणे विद्यापीठाला अद्यापही पूर्णवेळ कुलगुरू व इतर मुख्य प्रशासकीय अधिकारी नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा दावा विद्यार्थी संघटनांनी केला आहे. विद्यार्थी समस्यांच्या गर्तेत असताना दुसरीकडे प्रभारी कुलगुरू आणि इतर अधिकारी दौऱ्यावर असतात असाही आरोप केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)