एक्स्प्लोर
बेळगावातले ओल्ड मॅन ठरतायत चर्चेचा विषय
नाताळच्या दरम्यान बेळगावात आणि गोव्यात ठिकठिकाणी ऑल्ड मॅनचे पुतळे उभे केले जातात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्यांचे दहन करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात ही परंपरा सुरु आहे.

बेळगाव : जगभरात वेगवेगळ्या प्रकारे नववर्षाचे स्वागत केले जाते. नाताळच्या दरम्यान बेळगावात आणि गोव्यात ठिकठिकाणी ऑल्ड मॅनचे पुतळे उभे केले जातात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला या पुतळ्यांचे दहन करण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात ही परंपरा सुरु आहे. यंदाही बेळगावात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे ओल्ड मॅनचे पुतळे उभारण्यात आले आहेत. बेळगाव शहरातील अनेक तरुण मंडळांनी वेगवेगळे ओल्ड मॅन तयार केले आहेत. अगदी चार पाच फुटापासून पंचवीस फूट उंचीचे ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून तरुण मंडळी ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामात गुंतली आहे. बेळगावात रात्री बारा वाजता या ओल्ड मॅनचे दहन करून नववर्षाचे स्वागत केले जाते. ओल्ड मॅन तयार करण्यासाठी गवत, कपडे, पुट्ठे यांचा वापर केला जातो. ओल्ड मॅन तयार करताना त्यामध्ये फटाके घातले जातात. विशेषतः कॅम्प भागात ओल्ड मॅन तयार करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. आता हे लोण शहरातील इतर भागात पसरले आहे. वर्षभरात चित्रपटात गाजलेल्या चित्रविचित्र व्यक्तिरेखा ओल्ड मॅनच्या रुपात उभारण्यात अलीकडे कल वाढत आहे. हॉलिवूडमधल्या दी रींग या हॉरर चित्रपटातील व्यक्तिरेखेची प्रतिकृती असलेले ओल्ड मॅनचे पुतळे बेळगावात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहेत.
आणखी वाचा























