एक्स्प्लोर
तीन दिवसात साईंच्या दानपेटीत 1 कोटी 7 लाखांच्या जुन्या नोटा

शिर्डी: शिर्डीत साईबाबांच्या दानपेटीत हजार पाचशेच्या नोटांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 3 दिवसात दीड कोटी रुपयांपैकी 1 कोटी 7 लाख रुपयांच्या नोटा हजार पाचशेच्या आहेत. एक हजार रुपयांच्या 5 हजार 500 तर पाचशे रुपयांच्या 11 हजार नोटा दान पेटीत मिळाल्या आहेत. जुन्या नोटांचं प्रमाण हे दुपटीनं वाढलं आहे.
नोटांबरोबरच 65 ग्रॅम सोनं तर 2500 ग्रॅम चांदीही साईबाबांना अर्पण करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीनं देणगी कक्षात जरी 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारल्या जात नसल्या तरी मंदिरातील दान पेट्यांमध्ये या जुन्या नोटा मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत.
दरम्यान, त्यामुळे ३० डिसेंबरपर्यंत आणखी जुन्या नोटा दान पेटीत मिळू शकतात. असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील काही मंदिरातील दानपेट्याच सील करण्यात आला आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement























