Nitin Desai Death: "रशेष शाहसह तीन नराधमांनी माझा स्टुडिओ लुटला", नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपचा तपशील समोर
रशेष शाह, स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल या नराधमांनी मला पैशांच्या धमक्या देऊन माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. माझ्या विरोधात षडयंत्र रचले आणि मला संपविले, असे गंभीर आरोप नितीन देसाई यांनी केले आहे.
मुंबई: ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Death) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लिपचा तपशील आता समोर आला आहे. एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं (Rashesh Shah) माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडिओ लुटला, असं देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या सगळ्याचा तपास खालापूर पोलीस सध्या करत आहेत.
माझा स्टुडिओ गिळण्याचे काम
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरवरच्या ऑडिओ क्लिप्स या पोलीस तपासाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत. ऑडिओ क्लिप्समध्ये नितीन देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत. नितीन देसाई ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले, रशेष शहा हा गोडबोल्या असून त्याने छोटया मोठया उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडिओ गिळण्याचे काम केले. त्याला 100 फोन केले परंतु फोन उचलत नाही. EOW, NCLT DRT यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन- तीन इनव्हेस्टर गुंतवणुक करण्यासाठी तयार असताना मला सहाकार्य केले नाही. माझ्यावर दुप्पच तिप्पट किंमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने प्रेशर करून मी दिलेल्या गोष्टी मान्य करत नाहीत.
मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे
स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा स्टुडीओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचे काम करीत आहेत. या लोकांनी माझी वाट लावली आहे. मला पैशांच्या धमक्या देऊन नराधमांनी माझ्यावर दबाव टाकला. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले. एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचले आणि मला संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी मला टोकाचे पाऊस उचलण्यास भाग पाडले, असे नितीन देसाई म्हणाले.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या पाच जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलीस लवकर चौघांना चौकशीला बोलवणार आहेत.
हे ही वाचा :