एक्स्प्लोर

Nitin Desai Death: 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार', नितीन देसाईंच्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य

एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असं आवाहन देसाईंनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केलं आहे.

मुंबई:  सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai Death)  यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डरवरच्या ऑडिओ क्लिप्स या पोलीस तपासाच्या केंद्रबिंदू ठरल्या आहेत.  त्यामध्ये नक्की काय आहे, याची माहिती माझाच्या हाती लागली आहे. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून 'लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार' हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेलं पहिलं वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असं आवाहन देसाईंनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केलं आहे.

एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका

राज्य शासनानंन या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे, मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे असं देसाईंनी या क्लिपमध्ये म्हटलंय. नितीन चंद्रकांत देसाई हे मंगळवारी रात्री दिल्लीहून एनडी स्टुडिओत परतले. त्यांनी आपल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या 11 ऑडिओ क्लिप असून त्याचा तपास पोलिस करणार आहेत.

लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीहून एनडी स्टुडिओला परतल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला बंगल्याच्या आसपास कोणी फिरू नका, असे सांगितले. तसेच एक व्हॉईस रेकॉर्डर दिला आणि हा रेकॉर्डर बहिणीकडे सोपवावा असे देखील कर्मचाऱ्याला सांगितले. सकाळी आठ वाजेपर्यंत कर्मचाऱ्याला कोणतीही हालचाल दिसली नाही. त्याने पहिल्यांदा व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकली आणि पहिल्या ऑडिओ क्लिपचे पहिले वाक्य ऐकून त्याला धक्काच बसला. लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे पहिल्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य होते. हे ऐकताच कर्मचाऱ्यांने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. ऑडिओ क्लिप्समध्ये देसाईंनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या चार व्यावसायिकांची नावं घेतल्याचं समजतं. या क्लिप्समधल्या देसाईंच्या आवाजाच्या नमुन्याची फॉरेन्सिक टीमकडून आधी तपासणी होईल. आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही होईल, असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. 

नितीन देसाईंच्या पार्थिवावर काल रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलं. चार डॉक्टरांच्या टीमनं पोस्टमॉर्टम केलं. देसाईंचा मृत्यू गळफास लावण्यानं झाला, असा प्राथमिक निष्कर्ष पोस्टमॉर्टममधून समोर आला आहे.  दरम्यान, देसाईंच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील, त्याच्या काही तास आधी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. 

हे ही वाचा : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget