एक्स्प्लोर
Advertisement
'निसर्ग'चा महावितरणलाही तडाखा, पोल पडले, विद्युतवाहिन्या तुटल्या, दुरुस्तीचे काम सुरु
निसर्ग चक्रीवादळाचा राज्यात अनेक ठिकाणच्या वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला लागली आहे.
मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळाने पोल देखील पडले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, नवी मुंबई, कल्याण, ईगतपुरी,नाशिक जिल्ह्यातील वीजयंत्रणेला मोठा फटका बसला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली असून सर्वप्रथम उपकेंद्रांचा वीजपुवठा सुरु केला जाईल व तेथून पुढे टप्प्या-टप्प्याने 11 केव्ही व लघुदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा लागणार आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला जबरदस्त तडाखा दिल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मालवण तालुक्याला बसला असून, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
Nisarga | 'निसर्गा'चा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू
उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या 33 केव्ही वाहिन्या व उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही वाहिन्यांवर अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विजेचे शेकडो खांब जमीनदोस्त झाले आहेत. ताराही तुटल्या आहेत. मालवण तालुक्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर जंगलात अनेक ठिकाणी मोठे-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने अख्खा मालवण तालुका अंधारात गेला आहे. प्रत्येक वाहिनी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करणे जोखीमीचे आहे. त्यामुळे खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.
नाशिकमध्येही महावितरणला मोठा फटका
चक्रीवादळाचा नाशिकमध्येही महावितरणला मोठा फटका बसला आहे. दरम्यान वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. जिल्ह्यातील व शहरातील वाहिन्यांवर वृक्ष पडल्याने वीजखांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुरक्षेसाठी काही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. ग्राहकांनी संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.
रायगड जिल्ह्यातही महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पोल पडून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. बंगलेवाडी, अलिबाग येथे दशरथ वाघमारे नामक व्यक्तिचा विद्युत पोल पडून मृत्यू झाला. श्रीवर्धन, अलिबाग, रोहा, पेण भागात मोठ्या प्रमाणात झाडं ही विद्युतवाहिन्यांवर पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक गावांमध्ये विजेचे खांब व रोहित्र कोसळले आहेत. हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण च्या वतीने शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
उर्जामंत्र्यांचे आवाहन
दरम्यान उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळल्यास , वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर 1800 233 3435 / 1800 102 3435 / 1912 वर त्वरित संपर्क करावा, असं आवाहन ट्वीट करत केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement