NIRF Ranking : महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान, मुंबई विद्यापीठाची सुद्धा झेप
NIRF Ranking : राज्यातील एकूण 12 शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे.
![NIRF Ranking : महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान, मुंबई विद्यापीठाची सुद्धा झेप NIRF Ranking 12 educational institutes and universities in Maharashtra ranked in the top 100 marathi news NIRF Ranking : महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान, मुंबई विद्यापीठाची सुद्धा झेप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/01/b4758b5b4c36f91796079561aad6967b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NIRF Ranking : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नेशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) म्हणजेच देशभरातील शैक्षणिक संस्थां, विद्यापीठांची शुक्रवारी रँकिंग जारी करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईने देशात सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. मागील वर्षी ही संस्था चौथ्या क्रमांकावर होती. मात्र यंदा संस्थेच्या गुणांकात भर पडली आहे. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून 25 व्या स्थानी गेले आहे. तर विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठाने 45 वे स्थान मिळवले आहे. राज्यातील एकूण 12 शैक्षणिक संस्थांनी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून हे रँकिंग जाहीर केले जाते.
ओव्हर ऑल रँकिंगमध्ये
1)मुंबई आयआयटी - तिसरे स्थान (82.35)
2)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 25 वे स्थान (56.99)
3) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या पुण्याच्या संस्थेने 26 वे स्थान (56.91)
4) मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने 28 वे (56.16) स्थान पटकावले आहे.
5) मुंबईच्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने 33 वे(54.84) स्थान पटकावले आहे
महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान
NIRF रँकिंगमध्ये मुंबई आयआयटी देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर महाराष्ट्रातील 12 शैक्षणिक संस्था विद्यापीठांना पहिल्या 100 मध्ये स्थान मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाची सुद्धा मागील वर्षीच्या 71 व्या स्थानावरून 45 व्या स्थानावर झेप, तर पुणे विद्यापीठ 12 व्या स्थानी, एका स्थानाने घसरण*
मुंबई विद्यापीठाची झेप, 71 व्या स्थानावरून थेट 45 व्या स्थानावर
यामध्ये सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने अकराव्या क्रमांकवरून बाराव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने मात्र विद्यापीठांच्या यादीत 71 व्या स्थाना वरून थेट 45 व्या स्थानावर झेप घेतलीये. देशात या NIRF रँकिंगमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास या चेन्नईच्या संस्थेने बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने द्वितीय स्थान कायम ठेवले आहे.
मुंबई विद्यापीठाची सातत्याने खूप मोठी सुधारणा
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणतात, “मागील पाच वर्षांपासून एनआयआरएफ रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने सातत्याने खूप मोठी सुधारणा केली आहे. टिचींग लर्निंग अँड रिसॉर्सेस, ग्रॅज्युएशन आऊटकम आणि आऊटरिच अँड इन्क्ल्युजीवीटी या तीन निकषात विद्यापीठाने दर्जेदार कामगीरी केली आहे. तर रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस आणि पीअर पर्सेप्शन यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने यावर लक्ष केंद्रीत केले आहे.” -
संबंधित बातम्या
NIRF Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)