एक्स्प्लोर

अलिबागमधील नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने जमीनदोस्त करणार

अलिबागच्या किहिम समुद्रकिनाऱ्याजवळ सुमारे 30 हजार चौरस फुटांचा नीरव मोदीचा बंगला आहे.

रायगड : पंजाब नॅशनल बँकेत सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीला राज्य सरकार आज मोठा दणका देणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये असलेला नीरव मोदीचा अवैध आलिशान बंगला आज डायनामाईटने जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी बंगल्यात 100 डायनामाईट लावले आहेत. सकाळी हा बंगला पाडला जाईल. अलिबागच्या किहिम समुद्रकिनाऱ्याजवळ सुमारे 30 हजार चौरस फुटांचा नीरव मोदीचा बंगला आहे. त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. अवैधरित्या कमावलेल्या संपत्तीमधून हा बंगला बांधण्यात आला आहे. या आलिशान बंगल्यात नीरव मोदी मोठमोठ्या पार्टी आयोजित करत असे. अलिबागमधील बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईसाठी प्रशासनाकडे पैसेच नाहीत मुंबई उच्च न्यायालयाने हा अवैध बंगला पाडण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर प्रशासनाने बंगल्याची तोडफोड सुरु केली. पण त्यानेही बंगला न पडल्याने बुलडोझर वापरण्यात आला. तरीही बंगला पडत नसल्याने प्रशासनाने स्फोटकं वापरुन बंगला जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. तीन ड्रील मशिनद्वारे आधी बंगल्याच्या खांबांमध्ये छेद केला जाईल. त्यानंतर डायनामाईटने बंगला जमीनदोस्त करण्यात येईल. 27 जानेवारीला काम थांबवलं नीरव मोदीचा आलिशान बंगला जमीनदोस्त करण्याचं काम 27 जानेवारीला थांबवण्यात आलं होतं. बंगल्यामधील मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढून मोदीच्या संपत्तीमधून अधिकाधिक रकमेची भरपाई व्हावी, यासाठी प्रशासनाने काम थांबवलं होतं. बेकायदेशीर बंगला कोणाचाही असो, कारवाई झालीच पाहिजे : हायकोर्ट हायकोर्टाने फटकारल्यानंतर कारवाई अलिबाग किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांवर कारवाई न करताच त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच ताशेरे ओढले होते. फरारी व्यापारी नीरव मोदीसह बॉलिवूडमधील कलाकारांच्या अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार टाळाटाळ करीत असल्याने हायकोर्टाने महसूल विभागालाही झापले होते. हायकोर्टाने फटकारल्यानंतर नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. अलिबागमधील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई, नीरव मोदीच्या बंगल्यावरही हातोडा

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
Yogesh Kadam :
"राजकीय आयुष्य वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे"; योगेश कदमांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल, म्हणाले, 'जो दर अपेक्षित आहे तो प्रॅक्टिकल...'
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Embed widget