एक्स्प्लोर
निलेश राणे यांची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार
रत्नागिरी: काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री काल कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चिपळूणच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींचा कृषी अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी घोषणा केल्याने, त्यांनी आचारसंहिता भंग केली, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.
तसंच मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील लोकांना प्रलोभन दाखवलं आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांवर आचरसंहिता भंगाची कारवाई व्हावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
दरम्यान, यावेळी निलेश राणे यांनी कोकणात शिवसेना-भाजपची छुपी युती असल्याचाही दावा केला. मुख्यमंत्र्यांनी कोकण दौऱ्यात शिवसेनेबाबत एक चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे या छुप्या युतीला पुष्टी मिळत असल्याचा दावा राणेंनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement