NIA Raids : टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची मोठी कारवाई, 10 राज्यांमध्ये छापे, PFI च्या 100 हून अधिक लोकांना अटक
NIA Raids : एनआयएकडून देशभरात छापेमारी सुरु आहे. पीएफआय संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे.
Kerala NIA Raids : देशभरात केंद्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) छापेमारी सुरु आहे. टेरर फंडिग प्रकरणात ही कारवाई सुरु आहे. या संदर्भात कारवाई करत NIAने 10 राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) संघटनेचे पदाधिकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. केरळमध्ये एनआयएकडून सुमारे 50 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ही संपूर्ण कारवाई टेरर फंडिंग प्रकरणावरून म्हणजेच दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. सुरू आहे. देशातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई सुरु आहे. केरळमधील मांजेरी, मल्लापुरम या भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही केंद्रीय तपास यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आहेत.
केरळमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. या छापेमारीमध्ये एनआयएसोबत ईडीचं एक पथकही हजर आहे. एनआयएने आतापर्यंत 100 हून अधिक पीएफआय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. याआधी एनआयएने बिहार आणि तेलंगणामध्ये छापेमारी केली होती. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या संदर्भात आणखी कारवाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळनंतर एनआयए पीएफआयच्या इतर राज्यांतील कार्यालयांवरही छापेमारी करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या 10 राज्यांमध्ये ही कारवाई सुरू आहे. केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, यूपी, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून पीएफआयच्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
NIA is conducting searches at locations linked to PFI across 10 states including Tamil Nadu, Kerala, Karnataka, Assam.
— ANI (@ANI) September 22, 2022
NIA, ED along with state police have arrested more than 100 cadres of PFI.
एनआयए पाएफआय अध्यक्षांच्या घरी छापेमारी
एनआयएच्या या छाप्यात पीएफआयच्या सर्व अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये पीएफआयचे अध्यक्ष ओएमए सलाम यांच्या केरळमधील मांजेरी येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. हे छापे रात्री उशिरा सुरू झाले आणि ते आतापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये पीएफआयच्या सर्व लहान-मोठ्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्याचे वृत्त समजताच पीएफआय कामगारही याला विरोध करत आहेत.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही कारवाई
यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेकडून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. या दरम्यान सुमारे 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ज्यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. या छाप्यात अनेक डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. एनआयकडून ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशीही करण्यात आली. चौकशीच्या आधारे आता केरळ आणि इतर ठिकाणी छापे करण्यात येईल.