एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
नाणार विरोधी कृती समिती दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला
नाणार विरोधी कृती समितीने नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
![नाणार विरोधी कृती समिती दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला New Delhi : Rahul Gandhi meets Nanar Virodhi Kruti Samiti latest update नाणार विरोधी कृती समिती दिल्लीत राहुल गांधींच्या भेटीला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/28204709/Nanar-Rahul-Gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई/नवी दिल्ली : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला राजकीय पक्षांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. नाणार विरोधी कृती समितीने आज नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.
नाणारला शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं राहुल गाधी यांनी स्पष्ट केलं. आम्ही नाणारवासियांच्या पाठीशी असल्याची हमीही त्यांनी यावेळी दिली.
नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे
नाणारमध्ये उभ्या राहणाऱ्या ग्रीन रिफायनरीला भूमीपुत्रांचा जोरदार विरोध आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा धोक्यात येईल असा आरोप होत आहे.‘उद्धव ठाकरेंच्या सभेला नाणारवासियांचा विरोध नाही’
शिवसेनेने यापूर्वीच भाजपला विरोध करत नाणार प्रकल्प उभा करण्यास नापसंती दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेसनेही या प्रश्नात उडी घेतली आहे. काय आहे नाणार प्रकल्प? खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे. जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय. ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे. प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल. या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)