एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्याही आमदाराचा राजीनामा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला.
औरंगाबाद : वैजापूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करत भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपण विधानसभा सदस्यत्व सोडत असल्याचं सांगितलं.
‘मराठा आंदोलनात जीव देणाऱ्या माझ्या मतदारसंघातील काकासाहेब शिंदेंच्या मृत्यूच्या वेदना आणि राज्यभरातील मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी आमदारकी सोडत आहे,’ असं राजीनामा देताना भाऊसाहेब चिकटगावकर यांनी म्हटलं.
‘कायदेशीर बाबींवर बोट ठेवत राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यास चालढकल करत आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठा संताप आहे. राज्यभरातील लोकांनी फोनद्वारे हा संताप माझ्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळेच मी आमदारकी सोडण्याचा निर्णय घेतला,’ असं आमदार चिकटगावकर म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा,अशी मागणी करत कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याआधीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement