एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवनीत कौर राणांचा राष्ट्रवादीला रामराम?
अमरावती: लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या उमेदवारीमुळे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, त्या नवनीत कौर राणा राष्ट्रवादीलाच रामराम करण्याच्या तयारीत आहेत.
कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यक्रमात न दिसलेल्या नवनीत कौर, आता पदवीधर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजेच भाजपसोबत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे.
कौर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत असल्याचं अधिकृत सांगितलं नसलं, तरी सध्या त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिल्यानंतर, अमरावतीत राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि नेतेच नाराज होते.
अमरावतीमधले राष्ट्रवादीचे जुने नेते संजय खोडके यांनी अजित पवारांच्या विरोधात बंड पुकारलं होतं. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती.
आता संजय खोडके हे काँग्रेसकडून अमरावती पदवीधर मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. त्यांना विद्यमान गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं आव्हान आहे.
नवनीत कौर यांनी रणजीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
कोण आहेत नवनीत कौर?
नवनीत कौर या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. तसंच त्यांची दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणूनही ओळख आहे.
अमरावतीत आमदार रवी राणा यांनी, 2011 साली रेकॉर्ड ब्रेक सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी स्वत: रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले होते. यावेळी तब्बल 3100 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement