एक्स्प्लोर
दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोतर्फे 380 घरांची लॉटरी
![दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोतर्फे 380 घरांची लॉटरी Navi Mumbai Cidco Lottery दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोतर्फे 380 घरांची लॉटरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/11082817/CIDCO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी मुंबई : सिडकोतर्फे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 380 घरांची लॉटरी जाहीर करण्यात येत आहे. नवी मुंबईत व्हॅलीशिल्प, वास्तुविहार व सेलिब्रेशन आणि उन्नती गृहप्रकल्पांमध्ये शिल्लक 380 सदनिकांची विक्री योजना जाहीर होत आहे.
सिडकोतर्फे 2014 मध्ये खारघर सेक्टर 36 येथे व्हॅलीशिल्प, सेक्टर-15 येथे वास्तुविहार व सेलिब्रेशन आणि उलवे येथे उन्नती या गृहसंकुलांची निर्मिती करण्यात आली होती. या गृहसंकुलात शिल्लक असलेल्या सुमारे 380 सदनिकांसाठी सिडकोने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गृह विक्री योजना जाहीर केली आहे.
या योजनांमुळे सिडकोच्या गृहप्रकल्पांत घर मिळवण्याची पुन्हा एक संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. या सदनिकांची विक्री सोडतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सदर गृहप्रकल्पांच्या अर्जांची विक्री 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत केली जाणार आहे. 2 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
अर्ज पुस्तिकेची किंमत 200 रुपये ठेवण्यात आली आहे. सिडको भवन व रायगड भवन, सीबीडी आणि महाराष्ट्रातील टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडच्या सर्व शाखांमध्ये नागरिकांना अर्ज उपलब्ध होणार आहेत.
![दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोतर्फे 380 घरांची लॉटरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/11025832/CIDCO-Navi-Mumbai.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)