एक्स्प्लोर

Nashik Rains : पावसाची प्रतीक्षाच! नाशिक जिल्ह्यात 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा, वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई 

Nashik Rain Update : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने (Rain) तोंडच पाणी पळवलं असून सप्टेंबर सुरु झाला तरीही अद्याप पावसाचा पत्ता नाही.

नाशिक : गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने (Rain) तोंडच पाणी पळवलं असून सप्टेंबर सुरु झाला तरीही अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात टँकरफेऱ्या वाढल्या असून जिल्ह्यात तब्बल 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव (Nandgoan) तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून धरणांनी तळ गाठल्याचे चित्र आहे. पाऊस येणार तरी कधी? असा सवाल नाशिककर उपस्थित करत आहेत. 

यंदा राज्यावर दुष्काळाचे (Drought) सावट पसरले असून जून महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली, मात्र त्यानंतर जो पाऊस गायब झाला, तो अद्यापपर्यंत बरसलेला नाही. श्रावण महिना (Shravan Month) संपत आला तरी देखील अद्याप पावसाचा पत्ता नाही. काही दिवसांवर पोळा येऊन ठेपला, मात्र पिकायोग्य पाऊसच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ऑगस्ट संपला तरी पुरेसा पाऊस न झाल्याने शहरासह जिल्ह्यावरही भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तब्बल 68 टँकरद्वारे (Water Tanker) पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असून ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट आहे. नांदगावी सर्वाधिक गाव, वाड्या- वस्त्यांवर फेऱ्या सुरु आहेत. 

पाऊस नसल्याने शेती पिकांना फटका बसला असून त्याचबरोबर आता पिण्याचा पाण्याचा प्रश्नही उभा राहिला आहे. काही वर्षांनंतर पहिल्यांदाच इतकी भीषण परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील सहा तालुक्यांत आजही टँकरसमोर रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. येवला, मनमाड, नांदगाव आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), सुरगाणा, पेठ आदी भागात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या भेडसावते. मात्र, यंदा पावसाने ऑगस्ट ओलांडूनही दडी मारल्याने दुष्काळ जाहीर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ऑगस्टमध्ये त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे या तालुक्यातील किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न तरी सुटला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या तालुक्यातील टँकर्स बंद आहे. याशिवाय दिंडोरी, निफाड तालुक्यातील टँकरमुक्त आहेत. सध्या जिल्ह्यातील नांदगाव 18, येवला 16, चांदवड बारा, मालेगाव बारा, देवळा पाच, बागलाण पाच अशी तालुकानिहाय टँकरची संख्या आहे.

जिल्ह्यात 68 टँकरद्वारे पाणी पुरवठा 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी टँकरची संख्या तिप्पट झाली आहे. जून-जुलैपर्यंत पावसाचे आगमन होऊन किमान पिण्याच्या पाण्याची तरी समस्या काही गावांमध्ये मिटते. परंतु, यावर्षी ऑगस्ट ओलांडूनही पाऊस नसल्याने तहानलेल्या गाव, वाड्या-वस्त्यांची संख्या वाढली आहे. यंदा नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 18 टँकर्स सुरु आहेत. आतापर्यंत येवल्यात सर्वाधिक टँकर सुरु होते. यंदा मात्र नांदगावी सर्वाधिक दाहकता आहे. शासन स्तरावर तर टँकर्स पुरवण्याची धडपड सुरु आहेच, शिवाय अनेक ठिकाणी खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक वस्त्या, पाड्यांवर महिलांसह बालकांनाही पाण्यासाठी कित्येक मैल पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

नाशिक शहरावरही पाणी संकट 

महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्यामुळे ग्रामीण भागापाठोपाठ आता नाशिक शहरावरही टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सप्टेंबरमध्ये किती पाऊस होईल, याची शाश्वती नाही. सध्या गंगापूर धरणात 611 मीटरपर्यंत पातळी स्थिरावली आहे. राज्य सरकारच्या मेंढीगिरी समितीच्या समन्यायी पाणीवाटप धोरणात जायकवाडी धरण 65 टक्के न भरल्यास गंगापूर, दारणा, मुळा, प्रवरा, पालखेड, आळंदी व निळवंडे या धरणांतून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना दिवाळीपासूनच पाणीकपातीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे वरच्या धरणांमधून आता खालच्या धरणांमध्ये पाणी सोडले जाण्याची शक्यता असल्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Drought : नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, सिन्नर तालुक्यातील 41 गावात पेरणीही झाली नाही; शेतकरी चिंतेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget