Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Gavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
गेल्या काही वर्षात गावठी कट्ट्याची विक्री वाढली पण प्रश्न हा उपस्थित होतोय की मराठवाड्यात गावठी कट्टे नेमके येतात तरी कुठून बंदुकीचा हा आवाज मराठवाड्यात जणू नेहमीचाच झालाय परळीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पण हे गावठी कट्टे येतात कुठून? त्या आधी जाणून घेऊयात अलीकडच्या काळात झालेल्या कारवाया. संभाजीनगर ग्रामीण मध्ये सात, बीड मध्ये 26, धाराशिव मध्ये 13, जालन्यात 16, नांदेड मध्ये 44, लातूर मध्ये आठ, हिंगोलीत 11 तर परभणीत सहा प्रकरण गावठी कट्टे वापरण आणि विक्री संदर्भातली समोर आली आहे. मराठवाड्यात गावठी कट्टे विक्री करणारे एक रॅकेट आहे. खंडणी आणि इतर गुंध्यांमध्ये धमकावण्यासाठी याच गावठी कट्ट्याचा वापर केला जातो. गावठी कट्टे सहज बाजारात मिळतात, त्याच मुख्य कारण असत की याची किंमत गावठी कट्ट्याची किंमत साधारणपणे बाजारात 10, 15, 25, 30 आणि 50 हजारापर्यंत असते. त्यामुळे कुठलाही व्यक्ती ह्या गावठी कट्टे सहजासहजी खरेदी करतो. आणि मुळातच गावठी कट्ट्याची किंमत जी आहे ती त्याच्या बनावटीवरती अवलंबून असते. मात्र निर्मिती आणि वितरण पूर्णपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यात अशा गावठी शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. मराठवाड्यातील दुर्गम भागात, लहान गावात किंवा जंगल परिसरातही कट्टे तयार होतात. कट्टे तयार करण्यासाठी अर्धशिक्षित कामगार किंवा लोहारांना राबवलं जातं. ही शस्त्र स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडून रेल्वे, रस्ते वाहतूक आणि खाजगी वाहन वापरून मराठवाड्यात पोहोचवली जातात. राजकीय दबावासाठी स्थानिक वाद किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये गावठी कट्ट्यांचा वापर होतो. गावठी गट्ट्यांच्या अशा सहजपणे होणाऱ्या तस्करीमुळे मराठवाड्यात गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललय. ही बाब नाकारता येणार नाही.