एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही नारायण राणेंचा गड अभेद्य !
सिंधुदुर्ग : आपला गड अभेद्य राखण्यात नारायण राणेंना यश आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर आपलंच वर्चस्व असल्याचं नारायण राणेंनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. गेली 20 वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. यंदाही एकहाती विजय मिळवत राणेंनी बालेकिल्ल्यातील आपली ताकद दाखवून दिली आहे.
पहिल्यांदाच तिरंगी लढत
जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी 27 जागांवर विजय मिळवत सिंधुदुर्गात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गेली 20 वर्ष नारायण राणे विरुद्ध इतर सर्व पक्षीय अशी थेट लढत होती. मात्र, या वर्षी शिवसेना-भाजप यांच्यात युती नसल्याने जिल्ह्यात तिरंगी लढत होती.
दीपक केसरकरांना राणेंचा धक्का, तर कणकवलीतही वर्चस्व
सावंतवाडीत दीपक केसरकारांना जोरदार धक्का देत काँग्रेसने सावंतवाडीत 5 जागांवर वर्चस्व घेत दीपक केसरकारांना धक्का दिला. सावंतवाडीतल्या 9 जागांपैकी 5 उमेदवार काँग्रेसचे निवडून आल्यामुळे दीपक केसरकारांना सावंतवाडीत धक्का मानला जातो आहे. तर कणकवलीत जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यामुळे कणकवलीत नारायण राणेंचे वर्चस्व दिसून आले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निकाल (एकूण जागा - 50) :
- काँग्रेस - 27
- शिवसेना - 16
- भाजप - 6
- राष्ट्रवादी - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रीडा
क्राईम
Advertisement