मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी राणेंनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर, म्हणाले...
मंत्री नारायण राणेंनी पहिल्याच दिवशी पदभार स्विकारल्यानंतर अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. त्यामुळे सध्या दिल्लीत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे,
नवी दिल्ली : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काल मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार ते पाहणार आहेत. आज पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली आहे. कारण नारायण राणेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्याने चांगलीच तारंबळ उडाली.
नारायण राणे जेव्हा मंत्रालयात जेव्हा चार्ज घेण्यासाठी पोहचले तेव्हा त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. प्रश्न विचारल्यानंतर नारायण राणेंच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन उभे राहिलेल्या मंत्र्यांची चांगलीच तारांबळ उडाली. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? असा प्रश्न विचारला.
नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना विचारले गेल्या दोन वर्षात मंत्रालयाने किती रोजगार उपलब्ध केले? भेटण्यासाठी आल्यानंतर एकाही अधिकाऱ्याच्या हातात फाईल नाही? हा सगळा डाटा कोण सांगणार आहे? या वर अधिकाऱ्यांनी अनेक अधिकारी सुट्टीवर असल्याचे कारण दिले. जसे अधिकारी सुट्टीवरून परतील आल्यानंतर लगेच हा डाटा उपलब्ध करून दिला जाईल असे उत्तर दिले.
अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर त्यांना चांगले फैलावर घेतेले. लग्नासाठी किती कर्मचारी सुट्टीवर गेले आहे? राणेंच्या या प्रश्नानंतर शांतता पसरली. नारायण राणेंनी संध्याकाळपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण डेटासह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करत राणे म्हणाले, चांगले काम नाही केले परिस्थिती अशीच राहिली तर सर्व अधिकाऱ्यांना बदलण्यात येईल.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले. आता वरिष्ठ देतील ती जबाबदारी सांभळण्यास मी तयार आहे. माझा नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास दोन मिनिटांत सांगणे सोपं नाही. मी आतापर्यंत अनेक पदं भूषवली आहेत. मंत्रीपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम करणार, असेही नारायण राणे म्हणाले.