एक्स्प्लोर
राणेंच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी समर्थकांचं होम-हवन

मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळावं यासाठी राणे समर्थकांकडून मुंबईतील मुंलुंडमध्ये होम- हवन करण्यात आलं. राणेंना विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी समर्थकांनी देवाला साकडं घातलं. नगरपालिका निवडणुकांमधील अपयशानंतर राणेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता समर्थकांनी विरोधीपक्ष नेतेपद मिळावं यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. विधानसभेचं विरोधीपक्ष नेतेपद सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे, तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंकडे आहे. नारायण राणे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी समर्थकांनी पक्षश्रेष्ठींऐवजी आता देवाकडे साकडं घातलं आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
आणखी वाचा























