एक्स्प्लोर
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
राज ठाकरेंनी ज्याप्रकारे ‘ठाकरी शैली’त टीका केली, त्याचप्रमाणे राणेंनी आपल्या ‘राणे शैली’त उत्तर दिले.
मुंबई : राज ठाकरेंनी फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी नारायण राणेंवर टीका केली. त्या टीकेला नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. राज ठाकरेंनी ज्याप्रकारे ‘ठाकरी शैली’त टीका केली, त्याचप्रमाणे राणेंनी आपल्या ‘राणे शैली’त उत्तर दिले.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“फुटबॉल वाटले भाजपने आणि सिंधुदुर्गात लाथ मारली पहिली काँग्रेसने. आता दोन्ही नेटमधील गोली म्हणतायेत माझ्याकडे बॉल नको.”, अशी टीका राज ठाकरेंनी नारायण राणे यांचं नाव न घेता केली.
नारायण राणेंनी राज ठाकरेंना काय उत्तर दिले?
“ज्याचा फुटबॉल निकामी झाला आहे. फुटबॉल खेळू शकत नाही. अशांबद्दल मी भाष्य करावं, असं मला वाटत नाही.”, असं उत्तर राणेंनी राज ठाकरेंना दिले. शिवाय, “माझ्या घरात दोन आमदार आहेत. त्यांच्या पक्षात एकच आमदार आहे.”, असेही राणे म्हणाले.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement