सारंगखेड्याच्या बाजारात तब्बल दोन हाजर घोडे दाखल, पण रूबाब फक्त युवराज-रूबीचाच
सारंगखेडाच्या घोडे बाजारात जवळपास दोन हजार घोडे दाखल झाले आहेत. परंतु, बाजारात फक्त उज्जैनहून दाखल झालेल्या अवघ्या 32 महिन्याच्या युवराजचीच चर्चा आहे.
नंदुरबार : सारंगखेड्याच्या घोडे बाजारात दोन हजार घोडे दाखल झाले आहेत. परंतु, बाजारात फक्त युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी यांचीच चर्चा आहे. या सर्वांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्वशोकीनांनी बाजारत गर्दी केली आहे. या घोड्यांची किंमत ऐकून आपल्यालाही धक्का बसेल.
सारंगखेडाचा घोडे बाजार चांगलाच प्रसिध्द आहे. या बाजरात देशभरातून घोडे दाखल होत असतात. आताही या घोडे बाजारात जवळपास दोन हजार घोडे दाखल झाले आहेत. परंतु, बाजारात फक्त उज्जैनहून दाखल झालेला अवघ्या 32 महिन्याच्या युवराजची डौलदार चाल, उंची, त्यातील शुभ लक्षणे आणि त्याच सोबत त्याच्या किमतीचीच चर्चा आहे. युवराज पांढराशुभ्र नुकरा जातीचा अश्व आहे. त्याचे कान मारवाड आहेत, त्यात त्याची उंची 65 इंच इतकी आहे. ती अजून वाढेल त्यामुळे तो बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या युवराजची किंमत आहे तब्बल 21 लाख रूपये.
घोड्याची किमत, त्याची उंची, रंग आणि चाल यावर ठरत असते. घोडा जेवढा रुबाबदार तितकी त्याची किंमत जास्त. असे हे घोड्यांच्या किमतीचे समिकरण असते. याबरोबरच सारंगखेड्याच्या घोडे बाजारात दाखल झालेल्या रुबीची किंमत तब्बल 33 लाख रूपये आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल यांची किमत एवढी का आहे?
या रुबीचा एखाद्या राणी प्रमाणे रुबाब आहे. तिची उंची 63 इंच असून चाल रुबाबदार आहे. ती मधुलिका परिवारातील आहे. तीची सेवा करण्यासाठी 24 तास 4 मजूर असतात. तिच्या खानपानाची विशेष काळजी घेतली जाते. तिला दररोज पाच लिटर दूध, एक किलो गावराणी तूप, चणाडाळ, गहू, बाजरी सोबतच कोरडा आणि सुका चारा दिला जात आसतो .
सारंगखेडा येथील घोडे बाजरात रुबी नंतर बोलबाला आहे तो अप्सरा या सिंदी जातीच्या घोडीचा. तिची चाल आणि आदा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आश्र्वप्रेमी तिची रॅम्प वर वाट पाहत बसतात. एखाद्या देखण्या आभिनेत्रिला लाजवेल आशी तिची आदा असून चालही तशीच डौलदार आहे. तिची उंची 64 इंच आहे. एखद्या सौंदर्यवती प्रमाणे तिच्या खुराकाची काळजी घेतली जाते. तिच्या आहारात रोज 5 लिटर दूध, 1 किलो तूप, अंडी, गहू, चना आदी खाद्याचा समावेश आहे.
एवढे महागडे घोडे विकत घेणे अनेक अश्व शाैकीनांना शक्य नसल्याने देशभरातील आश्वप्रेमी या दोघी घोड्यांना पाहण्यासाठी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलला हजेरी लावत असतात. असे रुबाबदार घोडे आजपर्यंत आम्ही कुठे पहिले नसल्याचे या वेळी अश्व शोैकीनांनी सांगितले.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल दत्त जयंतीपासून अधिक रंगतदार होतो. 22 तारखेपर्यंत असे किमती घोडे दाखल होतील. त्याच्या किमती दोन कोटी पर्यंत असतील, असे अश्व जाणकार सांगतात.
महत्वाच्या बतम्या
- चेंबूरमध्ये पावडरचा पाऊस; एचपीसीएलच्या प्लांटमधून गळती, माहुलवासियांमध्ये भीती
- BEST Super Saver Plan : बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य
- मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं
- मध्य रेल्वेचे ग्रहण सुटणार? खारेगाव रेल्वे उड्डाणपूल सुरू होण्याची पालिकेची माहिती