(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मध्य रेल्वेचे ग्रहण सुटणार? खारेगाव रेल्वे उड्डाणपूल सुरू होण्याची पालिकेची माहिती
Central Railway : गेल्या अनेक वर्षांपासून कळवा खारेगाव येथील रेल्वे फाटक म्हणजे मध्य रेल्वेची डोकेदुखी ठरले होते, मात्र या डोकेदुखीपासून आता मध्य रेल्वेची आणि कळवा एकरांची सुटका होणार आहे.
Central Railway : गेल्या अनेक वर्षांपासून कळवा खारेगाव येथील रेल्वे फाटक म्हणजे मध्य रेल्वेची डोकेदुखी ठरले होते, मात्र या डोकेदुखीपासून आता मध्य रेल्वेची आणि कळवा एकरांची सुटका होणार आहे. कारण येत्या 25 डिसेंबरपर्यंत येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे सर्व काम पूर्ण होईल असे ठाणे महानगरपालिकेने मध्य रेल्वेला एका पत्राद्वारे कळवले आहे जर असे झाले तर मध्य रेल्वे ला खारेगाव फाटक कायमस्वरूपी बंद करता येणार आहे रेल्वेच्या प्रवासात प्रमाणेच कळवा पूर्व आणि पश्चिमेला राहणाऱ्या रहिवाशांना देखील होणार आहेत
कळवा येथील खारेगाव रेल्वे फटका मुळे होत असलेला त्रास पाहून 2006 साली याठिकाणी एक पूल बांधण्याचे ठरवले गेले. त्याला 2008 झाली ठाणे महानगरपालिकेने मंजूर घेऊन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर कळवा पूर्वेला आणि पश्चिमेला पूल ज्या ठिकाणी उतरवायचा होता त्याजागी जमिनीचे अनेक वाद समोर आले, यातील मफतलाल कंपनीच्या जमिनीच्या वादामुळे सर्वात जास्त विलंब झाला. त्यामुळे प्रत्यक्षात हे काम 2015 साली पूर्ण झाले. यातदेखील ठाणे महानगरपालिकेने अत्यंत दिरंगाई केल्याने अजूनही हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आताच्या घडीला या उड्डाणपुलाचे जवळजवळ सर्व काम झाले आहे. ज्यावेळी हा उड्डाणपूल सुरू होईल, त्याच वेळी खारेगाव रेल्वे फाटक बंद करण्यात येईल आणि मध्य रेल्वेला त्यांच्या लोकल सेवा वेळेत सुरू ठेवता येतील. दुसरीकडे हे रेल्वे फाटक बंद झाल्यानंतरच पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे उर्वरित काम देखील पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे खारेगाव उड्डाणपूल कधी सुरू होतो यावर अनेक प्रकल्प अवलंबून आहेत. आता थेट ठाणे महानगरपालिका न्यूज अधिकृत पत्राद्वारे 25 डिसेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल असे सांगितल्यामुळ मध्य रेल्वेचे ग्रहण सुटण्याची चिन्हे आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live